उद्धव ठाकरेंचा एल्गार: पडत्या पावसात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read
छत्री-ना रेनकोट उद्धव ठाकरेंचे भरपावसात भाषण; राम मंदिर देणगी अपहारप्रकरणी भाजपवर हल्लाबोल

मुंबई: राम मंदिर देणगी अपहाराविरोधात राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथे राम रक्षा आंदोलनाला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी या आदोलनाची हाक दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने आंदोलनात जनसागर उसळेल की नाही याबाबत शाश्वती नव्हती. मात्र भरपावसातही छत्र्या अन् रेनकोट घेऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी आज उपस्थिती लावली. महत्वाचं म्हणजे भगवा सदरा घालून उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आज जनतेशी संवाद
उद्धव ठारेंनी खास शैलित भाषणाला सुरुवात केली “ जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, माता आणि भगिनींनो ... या एका वाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी देशातील तामाम हिंदुंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटलं होतं. आजही तोच क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर, कडवट आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आपण हिंदू भोळे, भाबडे आहोत. पण मूर्ख नाही आहेत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललो आहे की अब हिंदू माफ नही करेगा” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ या देशाची सत्ता हाती घेताना श्रीरामाच्यवा घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी जेवढं काम केलं तेवढं मला वाटत नाही दुसर्या पक्षाने केलं असेल. शिलापूजन केलं, रथयात्रेत सामिल झाले, आयोध्येत जाऊन कारसेवा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडले, त्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. तेव्हा बाळासाहेब ठाकरे पाठीशी उभे राहिले होते. हिंदू भयग्रस्त होता, आक्रमित होता, आधार शोधत होता. तेव्हाव शिवसेनेचा भगवा हातात दिला” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ 12 वर्षे होऊन गेली, आज ज्या साठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली पण त्यानंतर शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी अफजलखानी विडा उचलला. हिंदुत्वाचा गैरफायदा घेणार्यांविरोधात शिवसेनाच निधड्या छातीने प्रश्न विचारू शकते. आयोग्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है, असं त्यांनी म्हटलं आहे. ही आयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील? भगव्यांचं सरकारप आलं असं आपल्याला वाटलं होतं. अटल जी म्हणाले होते की अब हिंदू मार नही खाएगा, पण हिंदूंना लुटणारं सरकार बसलं आहे. हे दुर्भाग्य आहे. हे आरोप मी करत नाहीय,हे आरोप अनेकजण करत आहेत. शंकराचार्यांनी म्हटलं होतं की केदारनाथमधील सोनं लुटलं आहे. मध्य प्रदेशातील मंत्र्यांनी महाकालची जमीन लुटली आहे. बद्रीनाथमधूनही अपहाराच्या बातम्या येत आहेत” असंही ते म्हणाले.
“ शिवसेनेनेही राम मंदिरात देणगी दिली होती. चांदीची वीट दिली होती. कुठे गेलं हे सर्व? मला शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे शौचालयात लवले जात होते, एवढं यांचं हिंदुत्व घाणेरडं? हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. तेथील साधुसंत आता म्हणत आहेत की, सगळे चोर लोक तिथे बसले आहेत. साधूसंतापैकी एकाचं वाक्य आहे, जेव्हा आम्ही मंदिरात दर्शनासाठी जातो, तेव्हा आमची लंगोटीही तपासली जाते. साधूसंतांशी असं वागता आणि करोडोंचा माल गपापा करत आहात? जो नवस बोलातो, श्रद्धेने तिथे जातो, फुल ना फुलाची पाकळी तिथे देतो, हे गायब करता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला हिंदू बोलून घ्याची” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.



Comments