top of page

शिवसेनेचे राम रक्षा आंदोलन, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या देणगी निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्यांवर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणगीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी ‘ राम रक्षा आंदेालन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची सुरूवात रविवारी (दि.5) जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता दादर येथील मारुती मंदीराजवळ होणार असल्याचे ठाकरे म्हणाले.


राम मंदिर देणगरी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी शुुक्रवारी(दि.3) आयोजीत प्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते, पुढे ते म्हणाले राम मंदिर हा केवळ धार्मिक विषय नसून लाखो हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. या श्रद्धेशी कुणीही खेळ करू नये. राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना सत्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.


“ एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांनी‘ अब हिंदू मार नही खाएगा’ असे म्हटले होते. आज मी एवढेच म्हणेन की, अब हिंदू माफ नही करेगा’ रामाच्या नावाने राजकारण करणार्‍यांनी आता जनतेला उत्तर द्यावे लागेल.


राम मंदिरासाठी जमा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा अरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “ राम मंदिराच्या नावावर लोकांनी श्रद्धेनूे देणग्या दिल्या. मात्र आता या निधीबाबत संशय निर्माण झाला आहे. काही माध्मांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या पैशांचा वापर राजकीय हेतूंसाठी, पक्ष फोडण्यासाठी किंवा सत्तेचे राजकारण करण्यासाठी होत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असंही ते म्हणाले.


राम मंदिर आंदोलनात शिवसैनिकांनी मोठा सहभाग घेतल्याची आठवण करून देताना ठाकरे म्हणाले की, त्या काळात अनेक हिंदूंनी संघर्ष केला होता. त्या भावनांचा वापर करून भाजपने राजकीय फायदा घेतला आणि आज त्याच राम मंदिराच्या नावावर प्रश्न निर्माण झाले आहेत असा आरोपही त्यांनी केला.


राम मंदिर बाबत सत्या बाहेर यावे आणि जाबाबदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राज्यभरातील रामभक्तांनी रविवारी दादारमधील मारुती मंदिराजवळ एकत्र यावे, असे अवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. या आंदोलनाला ‘ राम रक्षा आंदोलन’ असे नाव देण्यात आले असून रामभक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण करण्यासाठी हा लढा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राम मंदिर निधीबाबतचे आरोप, त्यावरील चौकशी आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप यावर संबंधित यंत्रणा किंवा भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page