top of page

डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटनॉल मिस्त्रनाची तयारी, नितीन गडकरींची घोषणा

पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल यशस्वीरित्या मिसळल्यानंतर आता केंद्र सरकारने आपला मोर्चा डिझेल गाड्यांकडे वळवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या बायोफ्युअल ट्रान्झिशनच्या पुढीच्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारताचे परकीय चलन वाचवण्यासाठी आणि इंधनावरीनल स्वावलंबन वाढवण्यासाठी आता डिझेलमध्ये 15 टक्क्यांपर्यंत आईसोब्यूटेनॉल मिसळण्याची योजना सरकारने आखली आहे.


सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडू शकतो की पेट्रोलप्रमाणे डिझेलमध्ये थेट इथेनॉल काव वापरले जात नाही? नितीन गडकरी यांनी स्वत: याचे कारण स्पष्ट केले आहे. “ इथेनॉल थेट डिझेलमध्ये रासायनिकदृष्ट्या मिसळता येत नाही. म्हणून आम्ही इथेनॉलवर प्रक्रिया करून त्यापासून ‘ आईसोब्यूटेनॉल’ तयार करत आहोत. हे आइसोब्यूटेनॉल डिझेलसाठी एक सर्वोत्तम आणि सक्षम पर्याय ठरू शकतो. ”


इतर बायोफ्युएल्सच्या तुलनेत याची ऊर्जा निर्मिती क्षमता जास्त आहे. हे इंधनाचे इंजिनसोबतचे ट्युनिंग उत्तम राखते, ज्यामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. पारंपारिक इंधनापेक्षा हे अत्यंत कमी कार्बन उज्सर्जन करते. तंत्रज्ञानातील प्रगतीचा दाखला देत गडकरी म्हणाले की, 100% इथेनॉल आणि आइसोब्यूटेनॉलवर दोन जनरेटर सेट यशस्वीरित्या चालवून दाखवले आहेत. यामुळे भविष्यात या इंधनावरर चालणारी इंजिने सहज बनवता येतील, हे सिद्ध झाले आहे.



दरम्यान, ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा पेट्रोलिसयम मंत्रालयाने सोशल मीडियारील ई20 पेट्रोल संदर्भातील सर्व अफवा आणि चुकीची माहिती अधिकृतपणे खोडून काढली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, इथेनॉलमुळे इंजिन खराब होत नाही, वाहनांची वॉरंटी किंवा इन्शुरन्स रद्द होत नाही, तसेच यामुळे पर्यावरणाला कोणातीही हानी पोहोचत नाही. हे संपूर्ण धोरण जागतिक अनुभवांवर आणि वैज्ञानिक अभ्यासावर आधारित आहे. यसा कार्यक्रमामुळे देशाचे 1.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचले आहे.

Comments


bottom of page