उद्धव ठाकरेंनी भाजपचा डाव उधळला!
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 2 min read

नागपूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विधानभवनात पत्रकार परिषद घेत शेतकर्यांचे प्रश्न, जाहीर केलेले पॅकेजसह विरोधी पक्षनेते पदावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी, सरकार आणि विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदासाठी होणार्या चालढकलवरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी भाजपने खेळलेल्या खेळीचा फुगाच फोडला आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली होती. मात्र मविआच्या मागणीला छेद देत भाजपने मोठी खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली होती. भास्कर जाधवांना शिंदेच्या शिवसेनेचा विरोध केल्याने भाजपने विरोधीपक्ष नेतेपदावरून गुगली टाकली होती. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी अनिल परब यांना पसंती देत भाजपने मविआमध्ये फूट पडण्याची रणनीती आखली होती.
मात्र आज थेट अधिवेशनाला हजेरी लावत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा फुगा फोडला. त्यांनी भास्कर जाधव यांचे नावा विरोधी पक्षनेतेपदासाठी कायम असल्याचे सांगत सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. तसेच विरोधी पक्ष नेते पदाबाबत तुमच्या मनात जो प्रश्न आहे तोच जनतेच्या मनात देखील आहे. या अधिवेशनाच्या आधीच याबाबत आमची चर्चा झाली आहे.
याआधी देखील पहिल्या अधिवेशनातच आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितल्याचे सांगत भास्कर जाधव यांचे दिल्याचे सांगितले. मात्र अजून त्यावर सरकार असो किंवा अध्यक्षांकडून उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री पदाबाबत सांगितले आहे. जर उपमुख्यमंत्री पदाबाबत खरच नियम असेल किंवा नसेल. तो कागदावरती असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद असल्याच पुन्हा एकदा उच्चार त्यांनी केला आहे.
ठाकरे यांनी हे एक नव्हे तर दोन दोन उपमुख्यमंत्री पदे जे हे सरकार निर्माण करू शकतं. ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहे, असाही सवाल त्यांनी केला आहे. तसेच महायुतीचे एवढे मजबूत सरकार की दोन दोन उपमुख्यमंत्री पदे जे संविधानिक नसलेले पद आहे. ती निर्माण करू शकता. पण हेच सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरतं आहे. कोणाला घाबरत आहे? 200 च्या वरती जागा निवडून आलेले असताना केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद असतानाही विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी का घाबरता आहात असा सवाल केला आहे.
या दरम्यान ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणावर देखील जोरदार प्रहार केला आहे. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा अध्यक्षांच्या अखत्यारीतला असून तेच निर्णय घेतील असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सरकार आणि विधानसभा अध्यक्ष एकमेकांकडे हा विषय ढकलण्याचे काम करत असल्याची चर्चा रंगली होती.
यावरून जर खरच हा विषय अध्यक्षांकडे असेल तर राज्याचे मुख्यमंत्री हे कणखर आहेत. तर त्यांनी याबाबत त्यांना का विचारले नाही, असा सवाल केला आहे. तसेच या बाबत आपल्याला अध्यक्षांना भेटण्याची गरज नसून ही लोकशाहीची मांडणी आहे. मात्र आता मुख्यमंत्री अणि अध्यक्षांनी याबाबत सांगड घातली आहे. अध्यक्षांबाबत आम्ही आमची मतं याआधीच स्पष्ट केली असून ही ढकलपंची सुरू आहे. पण आम्ही याबाबतच आमचे पत्र दिले असल्याचेही ठाकरे म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री नाव्हे तर पांघरुण मंत्री: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? दरम्यान, ‘ कोण होतास तू, काय झालास तू’ या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं. मला मुख्यमंत्र्याची द्या येत असल्याचं म्हणत ठाकरे म्हणाले ‘ कोण होतास तू काय झालास तू एवढ्या सगळ्या भ्रष्टाचार्यांना जवळ घेतलंस तू, स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचंही ठाकरे म्हणाले.



Comments