उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत, बारातमीत घडामोडींना वेग !
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

बारामती: उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधीसाठी सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार समवेत मध्यरात्रीच्या प्रवासानंतर मुंबईत दाखल झाल्या आहेत. इकडे बारामतीत शरद पवार यांनी पत्रकार परिषदत सुनेत्रा पवार न बोलताच मुंबईला निघून गेल्याचे सांगितले. मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी बारामती गाठली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खास करून दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय हा सस्पेंस कायम आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्या नावामुळे या प्रश्नावर पडदा पडला आहे. काल अजित पवार यांच्या अस्थिवित्सर्जनानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी वर्षानिवास्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्याचरबरोबर अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनित्रा पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मध्यरात्री सुनेत्रा पवार या पार्थ आणि जय पवार यांच्या समवेत मुंबईत देवगीरी बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. इकडे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दु:ख व्यक्त करत “ अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांना पक्षाने आणि बारामतीकरांनी अखंड साथ दिली. अशी काम करणारी कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते हा मोठा आघात आम्हा सर्वांवर झाला आहे. मात्र, या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल अशा भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार आपल्याला न बोलताच मुंबईला निघून गेल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेत आहेत. त्यावर मी भाष्य करणार नाही” असे ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षिरसागर यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तयारी सुरु असतानाच बारामतीत मात्र हालचालींना वेग आला आहे. शिवाय राष्ट्रवादी एकत्रिकरणाबाबत 17 जानेवारी रोजी शरद पवार, अजित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादीचे नेत्यांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणा बाबत हालचाली सुरू असताना अजित पवार यांचे दु:खद निधन झाले. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मुंबईत लोकभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरु आहे. अगदीच साध्या पद्धतीने शपविधी होणार असल्याचे बोलले जात असतानाच इकडे बारामतीत शरद पवार यांची पत्रकार परिषद आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकार्यांची बारामतीकडे धाव या घडामोडीवरुन राजकीय वर्तुळात मोठा सस्पेंन्स निर्माण झाला आहे.



Comments