top of page

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन भिषण अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू; राज्यावर शोककळा, चाहत्यांच्या आश्रूंचा बांध फूटला


बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती जल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारदौर्‍यावर होते. बारामतीच्या गोजुबावी येथे लँडिगदरम्यान त्यांच्या विमानाला भिषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे.


जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार दौर्‍यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी त्यांच्या पाच सहकार्‍यां समवेत खासगी विमानाने बारामतीच्या दिशेन निघाले होते. त्यांच्या खासगी विमानाने मुंबई एअपोर्टवरून सकाळी 7:00 वाजता बारामतीच्या दिशेने टेकॉप केले. बारामती मध्ये लँडिगदरम्यान वैमानिकाचा ताबा सुटल्याने गोजुबावी येथे भिषण अपघात झाला. या अपघातात वैमानिकासह अजित पवार व त्यांच्या समवेत असलेल्या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघाताची माहिती कळातच बारामतीकरांनी बारामती रुग्णालयाबाहेर गर्दी केली. छोटं सात सिटर विमान पाच नांव समोर येत आहेत, विधी जाधव, पिंकी माई, कोपायलट सुमित कपूर , कोपायलट संभावी पाठक असे एकून पाच जण होती, विमानाचा नंबर व्हीटीएसएसके इंडियन प्राप्त माहितीनुसार व्हीजिबलिटी अत्यंत कमी होती आणि व्हीजिबलिटी कमी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला या प्रयत्नमध्येच विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.


चाहत्यांचा अश्रूंचा बांध फूटला: विमान दुर्घटनेची माहिती मिळताच राज्यभरातून कार्यकर्त्यांसह चाहत्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली आहे. बारामतीकरांसह चाहत्यांच्या आश्रूंचचा बांध फुटला आहे.

Comments


bottom of page