top of page

उपमुख्यमंत्रीपदाबाबत हालचालींना वेग; राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईला बोलावलं!


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी (दि.29 जानेवारी) बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून एकमताने शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीच्या गोटातून मोठ्या हालचालींना वेग आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार उद्या शनिवारी (दि.31) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आज मुंबईच्या पक्ष प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावलं जाणार आहे. सर्व आमदारांना मुंबईमध्ये बालावून एकमुखानं उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीकडे असलेले उमपुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी आता सुनेत्रा पवार यांचं नांव चर्चेत आहे. उद्या पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आल्याची माहिती आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री कोण असणार? यावर एकमताने निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत असून, सुनेेता पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाय इतरही दोन ते तीन नावांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

Comments


bottom of page