top of page

ममता बॅनर्जी यांच्या पराभव आणि सुवेंदू अधिकारींच्या विजयाचा अयोगाच्या आकडेवारीतून खुलासा

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने पहिल्यांदाच राज्यात ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता काबीज केली. भाजपच्या विजयासह मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ममतादीदींच्या केलेल्या पराभवाची बरीच चर्च झाली. अधिकारी यांनी सलग दुसर्‍या निवडणुकीत त्यांचा पराभव केला आहे.


ममता बॅनर्जी यांना अपल्या पारंपारिक भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाल्याने मोठा धक्का बसला. आता निवडणूक आयोगाकडील मतदानाची बुथनिहाय आकडेवारीर समोर आली आहे. ममतांचे घर असलेल्या वॉर्डमध्ये सुवेंदू अधिकारी ममतांपेक्षा सरस ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत ममतांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता.


भवानीूपूर मतदारसंघातील सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील लढत राज्यातील सर्वाधिक हायहोल्टेज लढत होती. या लढतीत संपूर्ण मतदारसंघातच अधिकारी वरचढ ठरल्याचे बुथनिहाय आकडेवारीत समोर आले आहे. त्यांनी 267 बुथपैकी 207 बुथमध्ये ममतांपेक्षा अधिक मते मिळविली आहेत.


ममता बॅनर्जी यांचे घर असलेल्या वॉर्ड क्रमांक 73 कालीघाट परिसरात अधिकारी यांना तब्बल 8 हजार 932 मते मिळाली आहेत. तर ममतांना केवळ 4 हजार 284 मतांवर समाधान मानावे लागले. अधिकारी यांना ममतांपेक्षा दुपटीहून अधिक मते मिळाली आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्ते आणि अधिकारी यांना स्पष्ट संदेश दिला होता, ममतांच्या त्यांच्या घरातच हरवायचे होते.


काही बुथवर ममतांना मिळालेली मते धक्कादायक आहे.भवानीपूर मतदारसंघातील बहुतेक बुथवर प्रत्येकी 400 ते 700 मतदारसंख्या आहे. अनेक बुथवर ममतांना 50 मतेही मिळाली नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 2021 च्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मतदारसंघातील सर्व सात वॉर्डमधून लीड मिळाले होते. मात्र, यावेळी त्यांचा सुमारे 15 हजार मतांनी पराभव झाला आहे.

Comments


bottom of page