उसणे दिलेले पैसे परत मागितल्याचा राग: मित्रानेच केला मित्राचा घात रायमोहातील खुनाचे गुड उलगडले; स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 2 min read

बीड: जिल्ह्यातील रायमोहा (ता. शिरुर कासार) जवळील दगडवाडी शिवारात सोमवारी (दि.2) राजुरी नवगन -चिंचपूर मार्गावर बाजूच्या खड्यात चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 रा. रायमोहा याचा मृतदेह अढळून आला होता. व्यवसायाने पेंटर असलेल्या चाँदच्या हत्येने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. पोलिसांसमोर खुनाच्या तपासाचे मोठे अव्हान होते मात्र, पोलीस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण होताच अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.
रायमोहा येथील व्यवसायाने पेंटर असलेल्या चॉद अल्हाहुद्दीन तांबोळी हा रविवारी (दि.1) रात्री सकाळी 10:00 वाजता बीड येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळी मालकीच्या मोटारसायकलवरून बीडहून परतत असताना रात्री 7:45 वाजता खोकरमोहा शिवारात मोटारसायकल लावली आहे ती घेवून जा, कामानिमीत्त निरगूडी (ता. पाटोदा) येथे जात असल्याचे आरबाज खलिल तांबोळी यास फोनवरुन सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यास फोनवरुन संपर्क साधला असता मी हिवरशींगा येथे आलो असल्याचे सांगितले मात्र, त्यानंतर दोन मोबाईल पैकी एक फोन बंद येऊ लागला आणि दुसर्या फोनवर प्रतिसाद मिळत नव्हता. नातेवाईकांनी त्याचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर पहाटे शिरुर कासार पोलिस ठाणे गाठून नातेवाईकांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. सोमवारी (दि.2) सकाळी महामार्गावरुन प्रवास करणार्या एकाने पाटोदा पालिसांना (रायमोहा चौकी) दगडवाडी शिवारात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये रक्तभंबाळ अवस्थेत तरुण पडल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठत तरुणाची ओळख पटवून नातेवाईक, ग्रामस्थांच्या मतदीने पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी रायमोहाच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
घटनास्थळाच्या पाहणीतून चाँद याच्या डोक्याला मागील बाजूस दगडाने ठेचल्याची खोलवर जखम होती. शिवाय, त्यास रोडवरुन फरफटत खड्ड्यात आणून फेकल्याचे दिसून आले. सरळ, संवेदनशिल स्वभावाच्या चाँदच्या हत्येने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. पाटोदा पोलिसांसमोर तपासाचे मोठे अव्हान होते, रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी प्रथम त्याच्या कामापासून तपासाला सुरूवात केली काहींची चौकशी केली. चाँद याचा मोबाईल लोकेशनवरून एकाचे वेळी चॉद व इतर मोबाईल नंबरच्या स्ट्रेसवरुन अतिक गुलाब तांबोळी रा. ईस्लामपुरा पेठ बीड याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी मागावर असलेल्या पथकास अतिक बीडच्या शासकिय रुग्णालय परिसरात मिळून आला. त्यास प्रथम विचारपुस केली असता तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. परंतु पोलिसांंनी खाक्याचा दम दाखवताच आरोपीने गुन्हा कबुल करत मी चाँद तांबोळी याच्याकडून हात उसने पैसे घेतले हाते. सरदचे पैसे परत घेण्यासाठी चाँद तांबोळी याने तगादा लावल्याचा राग मनात धरुन चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी याची डोक्यात दगड मारुन हत्या केल्याची कबुली दिली .
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात खुनाचे गुड उलगाडून आरोपीस बेड्या ठोकल्याने नागरिकातून पोलिस कर्तव्याची कौतुक होत आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सुशांत सुतळे, श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, राहुल शिंदे, मारूती कांबळे, युनूस बागवान, श्री. यादव, श्री.सुरवसे, अशफाक, श्री. परझणे, शेख, हराळे यांची पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पाटोदा पोलिस पुढील तपास करत आहेत.



Comments