उसतोड मजूर बहीणी सोबतच्या बारा वर्षीय मुलीवर अत्याचार , बीडच्या केजमधील संतापजनक घटना, फरार होण्याच्या तयारीतील आरोपीस अटक
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

केज: मोठ्या बहिणी सोबत ऊस तोडणीसाठी आलेल्या बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील एका गावातून उघडकीस आली आहे. युसूफवउगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अत्याचार पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नाही. ती नातेवाईकांकडे असते. अशा भीषण परिस्थिती 6 वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहिण आणि मेव्हणे (दाजी) धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते.
सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी लक्ष्मण उर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय 34 वर्षे रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई हा देखील तिथेच होता. पीडित सहा वर्षाची बालिका प्रातविधीसाठी जात असताना, नराधम लक्ष्मणने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. पीडितेची बहिण व दाजींनी तात्काळ पोलिसा ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. युसूफवडगावा पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी लक्ष्मण वाघमारे यास गुन्हा दाखल झाल्याची भनक लागताच तो कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना युसूफवडगाव पोलिसांनी बसस्थानकावरून अटक केली. पीडितेच्या जबाबावरून आरोपी लक्ष्मण वाघमोर याच्या विरोधात युसूफवडगाव पोलिसाठाण्यात पोक्सो अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments