एटीएम पिनसाठी पुण्याच्या व्यापार्याची निर्घुण हत्यामोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या
- Navnath Yewale
- Jan 18
- 2 min read

पुणे: झारखंड पोलिसांनी एक संघटित गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करून संटू कुमार उर्फ कुंदन या आरोपीला अटक केली आहे. अनेक राज्यामध्ये पसरलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सराईत गुन्हेगार अपहरण आणि हत्यांसारखे गंभीर गुन्हे करायचे, अशी माहिती आहे. गेल्या वर्षी पुण्यातील एका व्यापार्याला स्वस्त मालाचे आमिष दाखवून पाटण्याला बोलावलं होतं. त्यानंतर त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं.
रामगडसह सायबर क्राईमू पथकाने संयुक्त कारवाई करत शनिवारी संटू कुमार उर्फ कुंदनला अटक केली. आरोपी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी संटू बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याचा व्यापारी लक्ष्मण साधू शिंदे यांच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड क्रिमिनल होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रामगडच्या गोला पालिस ठाण्याच्या हद्दीतील हेरमदगा गावात एका भाड्याच्या घरात राहून सायबर फ्रॉडचे रॅकेट चालवत होता.
पोलिसांनी आरोपी संटूकडून तीन आयफोनसह एकून 6 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये बोगस सिम कार्ड लावले होते . तसच 4.43 लाख रुपयांची रोेकड, बिहार नंबरची काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. चौकशी दरीम्यान संटूने पोलिसांना सायबर फ्रॉड, संघटित गुन्हेगारी करणार्या रॅकेटबाबत माहिती दिली, संटूने कबुल केले की, तो बँकेचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून लोकांना फसवायचा आणि खोट्या अश्वासनांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बनावट एपीके फाइल डाउनलोड करायचा. या फाइलमुळे त्या व्यक्तीचा फोन पूर्णपणे त्याच्या टोळीच्या नियंत्रणाखाली राहायचा. त्यानंतर ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास केली जात असे.
पोलिस तपासात असंही उघडकीस आलं की, त्यांची टोळी व्यापार्याना खोट्या मिटिंगचे आमिष दाखवून बोलावायचे आणि त्यांचे अपहरण करून खंडणी वसूल करायचे. गेल्या वर्षी पुण्यातील व्यापारी लक्ष्मण साधू शिंदे यांनाही झारखंडच्या कोल इंडिया कंपनीच्या नावाने बनावट ईमेल पाठवून स्वस्तात स्क्रॅप मिळेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला पाटण्याला बोलावण्यात आलं होतं. त्याने एटीएम पिन सांगण्यास नकार दिल्यावर त्याला बोगस मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता.



Comments