top of page

ओबीसी कार्यकर्ते पवान कंवर यांच्यावर प्राणघातक हल्ला!

लक्ष्मण हाके यांचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप

ree

बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय ओबीसी कार्यकर्ते पवन कंवर यांच्यावर रात्री गेवराई तालुक्यात एका हॉटेलवर प्राणघातक हल्ला झाला. पवन कंवर यांच्या म्हणण्यानूसार हॉटेल मध्ये जवळपास 40 ते 50 लोकांनी लाठ्या काठ्यासह त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पवन कंवर यांच्या समवेत इतर तीघांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जखमींवर माजलगांव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पवन कंवर यांच्यावरील हल्ल्यांनतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माजलगाव येथे पवन कंवर यांची भेट घेतली. लक्ष्मण हाके यांनी या हल्ल्यामागे आमदार विजयसिंह पंडीत याच्या कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. हाके म्हणाले की,गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सोबत आरोपींचे फोटो आहेत. तसेच याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती. यामध्ये त्याने विजयसिंह पंडित यांना उद्देशून म्हटले होते की, मला काम देऊ नका, परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या, असा गंभीर आरोप हाके यांनी केला आहे.

ree

आमदार विजयसिंह पंडित यांच्याच कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये पवन करवरहे जेवण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी 20 ते 25 जणांनी मिळून हल्ला केला. यामध्ये करवर यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यात देखील रॉडचा घाव घालण्यात आल्याची माहिती हाके यांनी दिली. आता पोलिस अधीक्षकांची —भेट घेत या आरोपींना अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याचे अश्वासन बीडच्या पोलिस अधिक्षकांनी दिल्याची देखील महिती हाके यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर व त्याचे तीन साथीदार काल मंगळवारी (दि. 23) संध्याकाळी 9:30 च्या सुमारास सावरगावजळव एका धाब्यावर जेवण करत होते. याच वेळी अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहान केली. या घटनेत पवन कंवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर त्यांच्या साथीदारांनाही मार लागला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बालक कोळी यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.


बीड, महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही:

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जुने सहाकरी हनुमंत धायगुडे यांनी हाकेंवर टीका केली आहे. हाके बीडमध्ये सामाजिक सलोखा बिघडवत असून हे न परवडणारं आहे. असे म्हणत धायगुडे यांनी हाकेंना खडेबोल सुनावले आहेत. याआधीही धायगुडे यांनी लक्ष्मण हाके यांच्या वर टीका केली होती. काही समाजकंटक आपल्या राजकीय फायद्यासाठी बीडमध्ये येऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हाके जात बघून हॉटेलमध्ये जात होते. विद्यार्थ्यांना जात बघुन शाळेमध्ये टाकल्या जात होतं. लोक चंद्रावर गेले पण आपण बीड जिल्ह्यामध्ये जाती-जातीत लोक बघायला लागलो. हे महाराष्ट्राला देशाला न परवडणार आहे. चर्चा विकासावर झाली पाहिजे, जातीजातीत भेद केल्यावर बीडचा, महाराष्ट्रचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. असेही लक्ष्मण हाके ंयाचे जुने सहकारी हनुमंत धारगुडे म्हणाले.

Comments


bottom of page