top of page

(व्हडिओ):करुणा मुंडे आक्रमक ; रुपाली चाकणकरांमुळेच महिलांना न्याय मिळत नाही सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा

Mar 19
2 min read

बीड: राज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर करूणा मुंडे यांनी गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बलात्काराचा अरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.


रुपाली चाकणकरांमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत करूणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बालात्कारी अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर दिसतात, त्याच्या संस्थेमध्ये त्या संचालिका आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पदावरील व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असंही करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या. जर सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांनी यावेळी भाजपच्या खासदार कंगणा रनावत यांच्यावरही टीका केली आहे. कंगन रनावत यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, “ कंगणा रनावत म्हणाल्या की राहुल गांधी टपोरी आहेत, त्यांना पाहिल्यावर महिलांना अस्वस्थ वाटतं, मग तुम्ही त्यांच्याकडे बघताच कशाला? सोनिया गांधीवर कंगनाने शिंतोडे उडवले. पण कंगना किती चरित्रहीन आहे हे गुगलवरचे फोटो पाहून दिसतं. कंगनाचे इंटनेटवरचे फोटो पाहून अनेक पुरुषांना अस्वस्थ वाटतंय. अगोदर तुम्ही बिकिनीवर फिरत होता, आज तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोलणार का?” अस करुणा मुंडे म्हणाल्या.

नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपुजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.


माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरुन पायउतार व्हावं, अशी मागणी केली. दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोेंबरे यांनी चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे.


अशोक खरात याला माहिला अयोग पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू होता आणि वर्षभरापूर्वी या सगळ्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, त्यावेळी त्यांनी अशोक खरात यांच्यावर नाही तर बातमी छापणार्‍यांवर कारवाई केली होती. त्या संदर्भातलं पत्र देखील आहे असंही विजय कुंभार म्हणाले. चाकणकर यांनी खरातवर कारवाई केली नाही. याचाच अर्थ हे सगळं घडवण्याचा प्रकार सुरू होता का? असा प्रश्नही विजय कुंभार यांनी केला आहे.

Comments


bottom of page