कर्नाटकाचे धर्मस्थळा प्रकरण; मंदिर परिसरता गाडलेले 100 नग्न मृतदेह, भारतातील सर्वात भयंकर घटना, बलात्कारानंतर हत्या करून...
- Navnath Yewale
- Aug 6
- 2 min read
एका माजी सफाई कर्मचार्याच्या दाव्यानुसार धर्मस्थळा मंदिर परिसरात तपासी यंत्रणांनी खोदकाम सुरू केले आहे. या खोदकामात मानवी हाडे, जबड्यांचे काही भाग अढळून आले आहेत.

कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळातून भारतातील सर्वात भयंकर प्रकरण समोर आलं आहे. मंदिराच्या परिसरात 100 हून अधिक मृतदेह गाडल्याचे समोर आले आहे. महिलांवर अत्याचारानंतर हत्या करून जमिनीत गाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. माजी सफाई कर्मचार्याच्या आरोपानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांगलागुड्डे भागात एसआयटीने सातव्या दिवशी खोदकाम सुरू ठेवलं आहे. जंगलातील साईट क्रमांक 6 आणि 11-ए जवळ 100 हाडांचे तुकडे सापडले आहेत. या साईटजवळ मणका, मांडी, जबड्याच्या हाडांचा समावेश आहे. हाडांचे छोटे छोटे तुकडे आढळले. दोन व्यक्तींची सर्व हाडे असू शकतात, असे बोलले जात आहे.
माजी सफाई कर्मचार्याने स्पॉट केलेल्या जंगलात 4 ऑगस्ट रोजी 7 तास खोदकाम केल्यानंतर एसआयटीचं पथक बाहेर आलं. त्यावेळी त्यांच्याजवळ अनेक पुरावे आढळले. जंगलात गाडलेले अनेक सील पॅक उपकरणेही आढळले. जंगलातून पुरावे आढळल्यानंतर लोकांची एकच गर्दी झाली.
जंगलात मृतदेह आढळत आहेत, त्यानंतर नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहे.
या जंगलात 22 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला.
2003 साली धर्मस्थळाजवळ एमबीबीएस पाहिल्या वर्षाची विद्यार्थी अनन्या भट्ट बेपत्ता होती. अनन्याची आई सुजाता भट्ट तेव्हापासून शोधत होती. तिच्या आईने बेलथांगडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सुजाता यांनी मदत मागितल्यानंतर मंदिराशी संबंधित लोकांकडून हल्ला देखील झाला होता.
मंदिराशी संबंधित लोकांकडून हल्ला झाल्याने अनन्याची आई अनेक महिन्यात रुग्णालयात कोमामध्ये होती. एका माजी सफाई कर्मचार्याच्या सांगण्यावरून जंगलात खोदकाम सुरु करण्यात आलं. वकील मंजूनाथ एम यांच्या दाव्यानुसार, खोदकामात सोमवारी तिघांच्या मृतदेहाचा सांगडा सापडला. त्यात एका महिलेच्या सांगड्याचा समावेश आहे.
खोदकाम करताना अनेक जण डोंगरावर घसरून जखमी झाले. साक्षीदार जयंत टी यांचा दावा आहे की, 15 वर्षापूर्वी 13 ते 15 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिसांत तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. तसेच मृतदेह शवविच्छेदन न करता दफन करण्यात आलं.



Comments