top of page

कल्याण डोंबिवलीतील राजकारणाची शिसारी येते, मुंबईसह राज्यातील राजकिय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र संताप


मुंबई: कल्याण- डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसे नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमिवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सध्याच्या राजकारणावर, विशेष: कल्याण- डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “ कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली, नुसजा बाजार मांडलाय” असे राज ठाकरे म्हणाले होते. आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदेसेनेशी केलेल्या युतीमागची भूमिका स्पष्ट करत, ही युती सत्तेसाठी नव्हे तर मनसेचे नगरसेवक वाचवण्यासाठी केल्याचा दावा केला आहे.


दरम्यान, राजू पाटील म्हणाले की, मनसेच्या नगरसेवकांना सातत्याने भाजपकडून फोन येत आहेत. फोडाफोडाचं राजकारण खुलेआम सुरू आहे. त्यामुळे आमचे नगसेवक फुटू नयेत, पक्ष टिकून राहावा यासाठीच आम्हाला शिंदेसेनेशी युती करावी लागली, असं त्यांनी स्पष्ट केलं.


शिंदेसेनेशी केलेली युती स्वार्थासाठी नसून पक्षहितासाठी असल्याचं सांगताना राजू पाटील म्हणाले, “ आम्ही शिंदेसेनेला फक्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्तेत जायचं असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. तसं काहीही केलं नाही. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.” या निर्णयाबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आधीच कल्पना देण्यात आली होती. असं म्हणत “ भाजपला मनसेविषयी बोलण्याच नैतिक अधिकार नाही” असा टोलाही त्यांनी लगावला.


पुढे बोलताना राजू पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली “ राजकारणात संधी प्रत्यकालाच मिळते, पण कोणी मित्र असल्याचं सांगत शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष फोडत असेल, एक पक्ष सातत्याने माझा पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर ते ओळखण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा” अशी टीकरत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.


दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कल्याण- डोंबिवलीसह राज्यातील राजकीय पवरिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला होता. “ आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरला आहे. मुंबईसह कल्याण-डोंबिवली आणि इतर ठिकाणचा हा बाजार पाहून अक्षरश: शिसारी येते, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय, बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. ते असते तर हे पाहून किती व्यथित झाले असते?” अशा शब्दांत त्यांनी राजकीय फोडाफोडीवर प्रखर टीक केली होती.

Comments


bottom of page