top of page

कारागृहातही वाल्मिक गँगचा माज, कर्मचार्‍याला धमकी!

ree

बीड: सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झालं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीडच्या कारागृहात आहेत. वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार असल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी मा. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली असतानाच कराडच्या जामिन बाबतच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. अशातच सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणातील कर्मचार्‍याला धमकी दिली आहे.‘ बाहेर आल्यावर तुला बघतो’ अशी धमकी घुलेनं दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.


शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी प्रतीक घुली धमकी दिल्याचा आरोप केला आहे.


प्रतिक घुले हा बीड जिल्हा कारागृहात असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे. ‘ या आरोपींना पश्चाताप नसून पराक्रम केल्याची भावना आहे. आरोपी हा सुटून आल्यानंतर तुझं बघतो, अशी धमकी कर्मचार्‍याला दिली आहे.


‘ या प्रकरणी कारागृह अधिक्षकांनी काही कारवर्इा करावी, जर करागृह अधिक्षक यांनी कारवाई न केल्यास साडी चोळी भेट देऊ, असा इशाराच स्वप्नील गलधर यांनी दिला आहे. तसंच, मकोकामधील आरोपींना दुसर्‍या कारागृहात पाठवण्याचा आदेश असताना इथं का ठेवले जात आहे, असा सवालच उपस्थित केला. तसंच, कारागृहामध्ये वाल्मिक कराड मोबाईल वापरतो. मोबाईल रिचार्ज करतो, असा दावाही त्यांनी केला आहे.


या संपूर्ण प्रकरणात बीड जिल्हा कारागृह अधीक्षक राजाराम सिद्धलिंग चांदणे यांनी फोनवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘ कारागृहात गवते नावाचे कर्मचारी आहेत. त्यांनी अशी काही तक्रार दिलेली नाही. असा धमकीचा प्रकार घडला नाही, असा खुलासा चांदणे यांनी केला. तर कारागृहात सीसीटीव्ही आहेत त्यामुळे कुठलीच गोष्ट लपून राहणार नाही कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही चांदणे यांनी सांगितलं. पण, प्रत्यक्षात माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

Comments


bottom of page