क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न अचानक लांबणीवर
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 1 min read
वडील रुग्णालयात, प्रकृती स्थिर

सांगली : स्मृती मानधनाच्या लग्नाआधीच कुटुंबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज रविवारी सांगलीमध्ये होणार्या लग्न समारंभाची तयारी जोरात सुरू होती. शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीत समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडले आणि आज दुपारी लग्नाचे विधी होणार होते. मात्र लग्न तात्पुरते रद्द करण्यात आले आहे.
या आनंदी वातावरणात स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले की, वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. आणि काळजी करण्याचे कोणतेही गंभीर कारण नाही. परिस्थितीमुळे कुटुंबात क्षणिक चिंता निर्माण झाली होती. परंतु नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधन नाश्ता करत असताना आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडताच पाहुण्यांमध्ये घबराट पसरली आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लग्नात तणाव निर्माण झाला आणि सर्वजण काहजीत पडले. तथापि, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले, तेव्हा सर्वांना सुटकेचा नि:श्वास सोडला. माहितीनुसार ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले आहे.
लग्न महाराष्ट्रातील सांगली स्मृती मानधनाच्या फार्महाऊसवर होणार होते. जास्त लोकांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. आज फक्त जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न झाले होते. आता लग्न कधी होईल? याबद्दल कोणतीही निश्चित माहिती नाही. स्मृतीचा लग्न तिच्या अलिकडच्या विश्वचषक विजयानंतर साजरा होण्याची अपेक्षा होती. परंतु आता सर्वजण निराश आहेत. शेफाली वर्मापासून ते स्नेह राणा आणि दीप्ती शर्मापर्यंत सर्वजण लग्नाला उपस्थित होते.



Comments