खासदार कंगणा रणौत यांचे ‘जेन झी ' वर अक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य
- Navnath Yewale
- 28 minutes ago
- 1 min read

नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणार्या अभिनेत्री खासदार कंगणा रनावत यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी ‘जेन झी’ बाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्या पुन्हा वादात आडकल्या आहेत. नीटसह विविध स्पर्धा परिक्षांतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुरकारले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कल्पक आणि विनोदी पोस्टर्स झळकावले, यावरून कंगणा रणौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘ जनरेशन गटर’ , किळसवाने, अशा आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलना बाबात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे देभरातून तिव्र पडसाद उमटत असल्याने खासदार कंगणा रणौत यांनी सारवासारव करत आंदोलनात असंविधानीक भाषा वापरणार्यांनाच मी असं म्हटलं होतं. मीडियाने जाणिपूर्वक मला लक्ष्य केल्याचंही कंगणा राणौत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्टवरून म्हणाल्या.
दरम्यान कंगणा राणौत यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलच वेळ नाही, या आधी अनेक गंभीर मुद्यांवरप आक्षेपार्ह विधान केल्यावने कंगना अनेकदा वादाच्या भोवर्यात अडकल्या आहेत.
कंगना रणौतने इंन्स्टाग्राम पोस्ट लिहित सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर जहीर टीका केली. रणौतने आंदोलनातील हे व्हायरल रील्स व्हिडिओ अत्यंत किळसवाणे असल्याचे म्हटले आहे. तसेच हे सर्व अत्यंत अश्लिल आणि कर्कश्श आहे; अशा प्रकारचं वर्तन करणार्या मुलांना नेमकं कोण जन्म देतं आणि वाढवतं?” असा अक्षेपार्ह सवाल तिने उपस्थित केला होता. त्याचबरोबर या पिढीला ‘जनरेशन गटार’ असे म्हणत हिणवले आहे. मला आता यातून सावरण्यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, असंही ती म्हणाली.
निवडून आलेल्या सरकारवर दबाव टाकून कोणाला मंत्रिपदावरून हटवायचे किंवा ठेवायचे हे जनता ठरवू शकत नाही, असं मत कंगनाने व्यक्त केलं. व्यवस्थेत बदल हवा असेल तर जंतरमंतरवरून सरकारला आदेश देण्यापेक्षा स्वत:निवडणूक लढवावी असंही ती म्हणाली. यावेळी तिने दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. आंदेालक हिंसक होऊन संसद परिसरात घूसू शकतात आणि खासदारांवर हल्ला करू शकतात, अशी भीती संसदेतील उपस्थित खासदारांना वाटत होती. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी संरक्षण कवच म्हणून काम केलं केले असंही कंगणा रणौत म्हणाल्या.



Comments