top of page

खोक्या भोसलेच्या मेव्हणीचे अपहरण; मध्यरात्री कुटुंबावर हल्ला, चार महिला जखमी

जखमी महिलांवर बीडच्या शासकिय रुग्णालयात उपचार; एका महिलेची प्रकृती गंभीर

ree

बीड: सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबाला मध्यरात्री मारहाणीची घटना समोर आली आहे. बीडच्या शिरुर कासारमधील झापेवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे. रात्री 10 ते 15 जणांचे टोळके आले आणि त्यांनी गंभीर मारहाण केली तसेच माझ्या अल्पवयीन बहिणीला देखील उचलून घेऊन गेले, असा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी केला आहे. या मारहाणीमध्ये चार महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.


बीडच्या जिल्हारुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे.

सतिश (खोक्या) भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्री दहा ते बारा जणांनी हल्ला केला यात चार महिला जखमी झाल्या आहेत. बीडच्या शिरुर कासार तहसील कार्यालयासमोरील वनविभागाच्या जमिनीत हा हल्ला करण्यात आला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी विनंती सरकारकडे केली आहे.


दरम्यान, या प्रकरणी तेजू भोसले म्हणाल्या की, रात्री 10-11 वाजता आमच्यावर हल्ला झाला अगोदर एक स्विप्ट आणि त्यानंतर एक स्कॉर्पिओ आली. गाडीतून 15-20 लोक खाली उतरल्यानंतर आम्हाला म्हणाले, पारध्यांनो तुम्ही इथे कशाला राहिला असं म्हणत आम्हाला माराहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना त्यांनी माझ्या लहान बहिणीचा हात ओढला आणि तिला ओढत घेऊन जाऊ लागले. दरम्यान मी वाचवण्यासाठी गेले तर माझ्या डोक्यात कुर्‍हाड टाकली, त्यानंतर मी तसंच पोलिस स्टेशनला पळत गेले. परंतु पोलिसांनीमला मदत केली नाही.


महिलांवर हल्ले

हल्ला करणार्‍याच्या हाता दांडके, कोयते, कुर्‍हाडी होत्या असा पीडित व्यक्तींनी सांगितलं. या मारहाणीत महिला ही जखमी आहेत त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण कोणी केली अद्याप समोर आले नाही. जीव वाचवण्यासाठी महिलांनी मोठ्याने आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण हल्लेखोरांनी मारहाण करणं सुरूच ठेवलं. त्यांनी थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार केले. या हल्ल्यात सर्व महिलांना दुखापत झाली. या प्रकरणात शिरुर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सतिश (खोक्य) भोसले भाई हा शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षापासून तो राजकारणात सक्रिय आहे आणि त्याची ओळख भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून आहे. सतीश (खोक्या) भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल आहे.

Comments


bottom of page