top of page

गाझामध्ये मृत्यूचे तांडव; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दररोज उपासमारीने मत आहेत 28 मुले!

ree

इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयानक होत चालली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये दररोज सुमारे 28 मुल मरत असल्याचे वृत्त दिले आहे. बॉम्बस्फोट, उपासमार, आजार आणि आवश्यक मदतीअभावी ही मुले आपले प्राण गमावत आहेत.


संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधीने म्हटले आहे की, गाझामधील मुलांना अन्न, पाणी औषध आणि सुरक्षिततेची सर्वात जास्त गरज आहे. आणि युद्ध त्वरित थांबवणे हे सर्वात महत्वाचे आहे. वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमिवर, इस्त्रायलने 2 मार्चपासून गाझाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केल्याचा दावा केला जात आहे. दररोज फक्त 86 ट्रक मदत पाठवली जात आहे. तर किमान 600 ट्रकची आवश्यकता आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठा दुष्काळ पडला आहे.


त्याच प्रकरणात, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी आणि 150 हून अधिक मानवतावादी संघटनांनी युद्ध थांबवून आवश्यक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझातील मुले हरवलेली पिढी बनत आहेत. ज्यांना मानसिकदृष्ट्या देखील मदतीची आवश्यकता आहे. तथापि, या सर्वांमध्ये, इस्त्रायलने बुधवारी गाझावर हल्ला केला. या हल्ल्यात गाझामध्ये किामन 83 लोक ठार झाले. ज्यात मदत मिळवण्यासाठी जाणारे 58 लोक होते. गाझाच्या नागरी संरक्षण विभागाने संयुक्त राष्ट्र आणि मदत संस्थांना इंधन आणि उपकरणे पुरवण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जखमींना वाचवता येईल.


या प्रकरणात, इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, 6 देशांनी गाझामध्ये 110 अधिक मदत पॅकेट हवाई मार्गाने टाकले आहेत. 27 जुलैपासून एकूण 785 पॅकेट एअर ड्रॉप करण्यात आले आहेत. इस्तायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझावर पूर्ण ताबा मिळवण्याच्या पर्यायासह सुरक्षा अधिकार्‍यांशी युद्धाच्या पुढील रणनीतींवर चर्चा झाली आहे.


हे संपुर्ण संघर्ष 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्त्रायलवर हल्ला केला तेव्हापासून सुरू झाला होता, तेव्हापासून गाझामध्ये 18,000 हून अधिक मुले मारली गेली आहेत. दर तासाला सुमारे एक मूल आपला जीव गमावत आहे. एकूणच, गाझामध्ये 60,933 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि 1,50000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.


गाझातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. त्याच प्रकरणात मध्यवर्ती औदा रुग्णालयाने सांगितले की, त्यांना अमेरिकन-इस्त्रायली मतद केंद्राजवळ इस्तायली गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या 7 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. 20 लोक जखमी देखील झाले आहेत. मुवासी परिसरातील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह 12 जणांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर, महिलेच्या जन्मलेल्या बाळाला वाचवले. त्याच वेळी, खान युनिस शहरातील जपानी परिसरातील एका दुमजी घरावर झालेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये बहुतेक महिला आणि मुले होती.

Comments


bottom of page