top of page

गुंडगिरीमुळे बिनविरोध 65 नगरसेवक झाले - इम्तियाज जलील


छत्रपती संभाजीनगर : एमआयम नेते इम्तियाज जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमवर केलेल्या “ पैशांची दलाली” च्या आरोपांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. जलील यांनी जालन्यात मुख्यमंत्र्यांकडून एका युवतीचा बुरखा काढल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, याला निंदनीय कृत्य संबोधत कारवाईची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी आक्षेप घेतला. शिरसाट यांच्यावर पलटवार करताना जलील यांनी, “ खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार का?” असा सवाल केला.


तसेच शिरसाट यांच्या गुवाहाटी दौर्‍यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि गोरगरीब एससी समाजाची जमीन तसेच एमआयडीसीचे भूखंड पदाचा दुरुपयोग करून बळकावल्याचा आरोप केला. जलील यांनी भारतीय जनाता पार्टी आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कथित गुंडगिरीमुळे 65 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या प्रकरावर तीव्र टीका करत याला लोकशाहीसाठी घातक ठरवले.

Comments


bottom of page