गुजरातमधून आली होती ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर!
- Navnath Yewale
- Aug 14
- 2 min read
शरद पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट, थेट नाव घेत किती कोटी मागीतल्याचंही सांगितलं.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर गुजरातमधून आली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, तर राज्यात लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, ईव्हीएमद्वारे होणार्या मतदानावर शंका घेतली जात आहे. आगामी काळात मतदान बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी विरोधक करत आहेत.
एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील निवडणूक अयोगावार गंभीर आरोप केले आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. ‘ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागापैकी 160 जागा निवडणून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं, शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.
त्यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलं आहे की, ही ऑफर गुजरातच्या नारायणदास पटेल या व्यक्तीने दिली होती. पटेल हे गुजरातच्या भूज येथे आयटी तज्ज्ञ आहेत. 50 हजार ते दिड लाखापर्यंत मताधिक्य वाढवून देण्याचा दावा पटेल यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी 5 ते 8 कोटी रुपयांची मागणी केली होती. ईव्हीएम आणि पोलीसही गुजरातचे असल्यामुळे मशीन मॅनेज करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला होता, ही बाब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळवली होती, मात्र महाविकास आघाडीला चांगला जनाधार असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पटेल सटाण्यात देखील येवून गेला होता, तुम्ही नाही केले तर विरोधी उमेदवारांची भेट घेणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. त्याची तक्रारही निवडणूक निर्णय अधिकार्याकडे करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केला आहे.



Comments