गुलाल लागला, पण कुंकू पुसलं; खोपोलित नगरसेविकेच्या पतीची हत्या भर रस्त्यात सपासप वार करून हल्लेखोर फरार; संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेरावो
- Navnath Yewale
- Dec 26, 2025
- 1 min read

खोपोली: नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात येत आली. नगर परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसांमध्येच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येची बातमी वार्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त लोकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालत पोलिस निरिक्षक सचिन हिरे यांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
सकाळी सात वाजेच्या सुमारास मंगेश काळोखे यांची काही हल्लेखोरांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता. हत्या केल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून फरार झाले. मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. सकाळी ते मुलाला शाळेत सोडायला गेले होते. शाळेतून परत येत असतानाचा त्यांच्यावर हल्ला झाला. तोंडाला रुमाल बांधलेल्या लोकांनी त्यांच्यावर वार केले आणि हत्या केली.
मंगेश काळोखे यांच्या हत्येची बातमी वार्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर लोक हळूहळू गदी करू लागले. त्यानंतर प्रचंड संख्येने लोक खोपोली ठाण्याच्या समोर आले. पोलिस ठाण्याला घेराव घातला, जोपर्यंत आरोपींना पकडणार नाही, तोपर्यंत हटणार नाही. पोलिस निरिक्षक सचिन हिरे यांना निलंबित करण्याची मागणही यावेळी नागरिकांनी केली.
पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांनी खोपोलीत घटनास्थळास भेट देवून पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या नागरिकांची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक ठिय्या देत मागणीवर ठाम होते. मंगेश काळोखे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पालिसांना सांगितले होते. पण पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही आणि आता त्यांची हत्या करण्यात आली असे संतप्त नागरिकांनी पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांना सांगितले.



Comments