ग्रामरोजगार सेवकास गावगुंडाकडून बेदम मारहाण, दुचाकीला बांधून फरफटत नेले
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 2 min read
बीडच्या गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार; गावगुंडांवर अॅट्रासिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील नादलगाव येथील जालिंदर सुरवसे वय 35 वर्षे या आदिवासी समाजातील ग्रामरोगारसेवकास गावातील काही गावगुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालिंदर सुरवसे यांना थेट घरातून बाहेर ओढत दुचाकीला बांधून चौकात फरफटत नेलं. एवढंच नाहीत र त्यांना लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सुुरवसे यांचे दोन्ही पाय फॅक्चर असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे. या गंभीर घटनेनंतर तलवाडा पोलिस स्टेशनच्या आधिकार्यांनी राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी केला आहे.
नालदगाव येथील ग्रामरोजगार सेवक जालिंदर सुरवसे यांच्याकडे दि.6 डिसेंबर रोजी अश्रुबा उत्तम राऊत, गोविंद सखाराम राऊत, भगवान आश्रुबा राऊत, विष्णू अश्रुबा राऊत यांच्यासह गावातील इतर 10 ते 20 गावगुंडांनी जालिंदर सुरवसे यांना त्याच्या घरात घुसून ‘ तू लय माजलास’ तुला सोडणार नाही , जिवे मारून टाकू, अशा धमक्या दिल्या, त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत या गुंडांनी सुरवसे यांना बाहेर ओढत आणलं आणि दुचाकीला बांधून गावातील चौकात फरफटत नेलं. चौकात लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करत त्यांचे दोन्ही पाय तोडून टाकले. आरोपी एवढ्यावरच न थांबता, त्यांनी सुरवसे यांच्या खिशातील 50 हजार रुपये रोख आणि मोबाईल देखील हिसकावून घेतला.
दरम्यान, बेदम मारहाणीनंतर पीडित सुरवसे यांची बहीण उषा साळुंके आणि आई यांनी तातडीने तलवाडा पोलिस स्टेशनकडे धाव घेतली आणि तिथे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी राजकीय दबावापोटी या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यास स्पष्टपणे टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी त्यांना दमदाटी करून पोलिसांनी त्यांना दमदाटी करून पोलिस स्टेशनच्या बाहेर काढल्याचा धक्कादायक आरोप पिडित कुटुंबियांनी केला आहे.
ग्रामरोजगार सेवक जालिंदर सुरवसे हे आदिवासी समाजाचे असून त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराबद्दल आणि पोलिस प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि संबंधित गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कलमांखाली तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पीडित आदिवासी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Comments