घातपात परळीच्या खरकट्याने ठरवला, आता सुट्टी नाही पाचही जणांची नार्को टेस्ट करा- जरांगे पाटील , जरांगे पाटीलांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली , धनंजय मुंडेवर सडकून टीका
- Navnath Yewale
- Feb 5
- 3 min read

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील याना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. जरांगे पाटील समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थक यांच्यातील कथित संवाद प्रकरणी आज दि. 5 मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अयजकुमार बंसल यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कथित घातपात प्रकरणाने आता पुन्हा वादाला तोंड फूटले आहे.जरांगे पाटील यांच्या कथित घातपात प्रकरणाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तशा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. आमदार धनंजय मुंडे यांनी स्वत:सह जरांगे पाटील यांच्या नार्कोटेस्टची मागणी केली. त्यावर जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे याच्यावर सडकून टीका करत ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर आणल्या. त्यानुसार आमोल खुणे (जरांग पाटील यांचे जूने सहकारी) दादा गरुड व धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीड येथील कांचन यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेवून मा. न्यायालयासमोर हजर केले.
दरम्यान, नुकतेच जामिनावर सुटलेले आमोल खुने यांनी माध्यमांशी संवाद साधत जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत “ मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, एसआयटी, सीआयडीसह माझ्यासह आता जरांगे पाटलांचीही येत्या दोन दिवसात नार्को टेस्ट करा” अशी मागणी करत जरांगे पाटील व त्यांच्या शिष्ठमंडळाचं सगळंच माहित आहे. लवकरच माध्यमांसमोर येऊन ते सांगणार असल्याचा इशाराही अमोल खुणे यांनी दिला होता.
अमोल खुणे यांच्या आरोपा नंतर अवघ्या दोन दिवसांत जरांगे पाटील समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थकांमधील कथित ऑडिओ क्लिप (वृत्तमानस या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही) समाज माध्यमांवर व्हायरल झाली. यासंवादामध्ये जरांगे पाटील समर्थकास समोरील व्यक्ती म्हणते “ जरांगे पाटलांना मी स्वत: कधीलही गोळ्या घालणार, त्याला मारुन टाकणार, वाल्या नाही वाल्मिक म्हणायचं, धन्या नाही धनंजय म्हणायचंं. तुला सुद्धा मारुन टाकेल ”यासह अर्वाच्च शिविगाळही करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
कथित ऑडिओ प्रकरणी आज जरांगे पाटील यांनी जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांची भेट घेवून नार्कोटेस्ट सह दोषींवर कारवाईची मागणी केली. पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील म्हणाले की, कर नाही त्याला डर कशाला, मी यापूर्वीच नार्को टेस्टचा आर्ज दिलेला आहे. कायद्यानुसार आरोपीने विरोध केला तर नार्कोटेस्ट होत नाही.
माझ्या घातपात प्रकरणात धन्याने जो कट रचला होता. त्या प्रकरणातील आरोपीच म्हणतोय नार्को टेस्ट करायची मग त्या आर्जाला मुजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही आर्ज मंजुर करून दुध का दुध आणि पाणी का पणी होवू द्या. कारण ही आशी संधी आहे आता‘ परळीचंं ते खरकटं आहे ना ते गप्प बसणारच नाही, हे असे जामीन झाली की पुन्हा पुन्हा कट रचणार, पुन्हा डाव रचणार आणि घातपात घडवून आणार हे शंभर टक्के तो करणार आहे. मला त्या आरोपी बद्दल काही बोलायचे नाही पण हे सगळं घडवून जो आणतोय तो धन्याच आहे.
माझ्या घातपात प्रकरणातील आरोपी इकडं समाजाच्या डागाबद्दल बोलायचंं आणि माझा घातपाताचा कट रणार्याला मुंडे साहेब म्हणायचं. त्यावेळी त्याची आई आणि पत्नी म्हणाल्या होत्या की तो व्यसणी आहे त्याच्या हातून असं काही घडलंही असेल. त्यामुळे मी शांत राहिलो. तो जेवढे आरोप करतोय तेवढे त्याला सिद्ध करावेच लागणार आहेत. या प्रकरणातील सर्व सीडीआर काढा, त्याला कोणकोण भेटलं, कोणाल त्याने फोन केलाय या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
त्याला फूस लावण्यात आली आहे, किंवा त्याच्यावर (अमोल खुणे) दबाव आहे म्हणून तो बोलतोय का? याची चौकशी करण्यात यावी. घातपात धन्याने ठरवलंय, रेकॉर्डिंग आहेत आरोपींच्या मोबाईलच्या. सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. परळीच्या खरकट्यासंग तुमच्या बैठका झाल्या आहेत. आता तो योग आला आहे आरोपीच म्हणतोय नार्को टेस्ट करा तर आता परळीच्या खरकट्याची धन्याची पण आणि यातील तीनही आरोपीसह माझीही नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे आता.
यांच्या तिघांच्याही जामिन रद्द करुन तपास यंत्रणेने त्यांचा अर्ज मा. न्यायालयासमोर ठेवावां. घातापातच्या प्रकरणावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी बिनबुडाचे आरोप (अमोल खुणे) आरोपीने थांबवावेत आरोपाबाबत पुरावे असतील तर गुन्हे दाखल कर. हे सगळ धन्याचं षडयंत्र आहे. परळीचं खरकटं आरोपीच्या खांद्यावर बंदूक ठेवून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करायला लागला आहे. आता मागार नाही घातपात प्रकरणातील तिन्ही आरोपींसह धन्यासह माझी नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



Comments