top of page

चंद्रकांत खैरे च्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ आठ नऊ महिन्यांपूर्वीच 20 आमदार फुटीच्या मार्गावर होते

ree

छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने ही नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आठ नऊ महिन्यापूर्वी 20 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटले आहे.


चंद्रकांत खैरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही पदाधिकार्‍याला, आमदारला किंवा मंत्री यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देणार नाहीत. आता त्यांचे भांडण सुरू आहेत ही नियती आहे, उद्धव साहेबांनी त्यांना फ्रिहँड देऊन देखील त्यांनी उद्धव साहेबांना सोडलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी पक्ष फोडला त्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चुकीचे नाही तर चांगलं काम करत आहेत.


पुढे बोलताना खैरे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे आठ नऊ महिन्यापूर्वीच उदय सामंत यांच्यासह वीस आमदार फुटत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पॅचअप केलं. मात्र, त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहे. जेव्हा त्यांना वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला निधी देत नाहीत, तो राग आणि रोष वाढल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मंत्री गडबड करायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी टिकणार नाहीत. आणि बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर जावे लागेल. आज भाजप एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे आणि पुढे काहीही होऊ शकते.


स्वार्थासाठी नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, कुणी जात नाही,जे जात आहेत त्यांचं पोट भरलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे मोठे झाले आणि सोडून जात आहेत म्हणजे स्वार्थासाठी ते गेलेले आहेत. शिंदे गट असेल किंवा भाजप असेल हे फक्त शिवसेना फोण्याचे काम करत आहे, दुसरा काहीच त्यांचा उद्देश नाही, जे सोडून गेले त्यांची परिस्थिती नंतर वाईट होते.


पुढे बोलताना खैरे म्हणाले की, ‘ मंत्रालयातील एक जण मला भेटला होता, ती व्यक्ती मला म्हणत होती कुठेही पत्र आता मंजूर होत नाही, मुख्यमंत्री देखील करत नाही आणि उपमुख्यमंत्री देखील करत नाहीत. त्यामुळे आता हे लोक परेशान झाले आहेत, पूर्वी शिंदे यांच्या काळात खूप पैसे वाटून झाले, ते फक्त शिंदे गटाला दिले नाही आणि यावेळी आता भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे यांना निधी देत नाही, त्यामुळे आता कोणी जाणार नाही.

Comments


bottom of page