top of page

चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्या आड

ree

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे आज, 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या अफवा आधीच पसरल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. आता, धर्मेंद्र यांनी अखेर जगाचा निरोध घेतला. अभिनेत्याचे निधन त्यांच्या 90 व्या वाढदिवसापूर्वीच झाले. ते 8 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार होते.


अलिकडेच, प्रकृती अस्वस्थ्यामुळे अभिनेत्याला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 11 दिवसांपर्यत आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्याने ज्येष्ट अभिनेत्याच्या संपूर्ण कुटुंबाला राग आला होता. रुग्णालयातून अभिनेत्याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता, जो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र रुग्णालयाच्या बेडवर पडलेले दिसले, त्यांच्या कुटुंबाभोवती (पत्नी, प्रकाश कौर, सनी देओल, बॉबी देओल आणि दोन्ही मुली) होते.


24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्रचा ‘एकीस’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला. या चित्रपटात तो मुख्य अभिनेता अगस्त्य नंदा यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणारा धर्मेंद्रचा हा शेवटचा चित्रपट असेल. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि मागे वळून पाहिले नाही. धर्मेंद्रच्या हिट चित्रपटांमध्ये ‘आयी मिलन की बेला’, ‘पूजा के फूल’, ‘हकिकत,’ ‘बाजी’, ‘सत्यकाम,’ “आया सावन झुम के,’ ‘ लोफर’, ‘चुपके चुपके,’ ‘चरस’, ‘ड्रीम गर्ल’, ‘धरम वीर’, ‘मझेरा’ आणि ‘गजबरा’ यांचा समावेश आहे.

Comments


bottom of page