छ.संभाजीनगरमध्ये निष्ठावंत आक्रमक, तिकीट कापल्याने आक्रोश
- Navnath Yewale
- Dec 30, 2025
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह भाजप नेते अतुल सावे यांच्या कार्यालवर पोहोचले. नाराज कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयाला घेरावो घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते, पदाधिकार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. त्यातच आज भाजपचे नेते अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर नाराज पदाधिकार्यांनी चांगलाच राडा केला. तिकीट नाकारल्याने भाजपाच्या महिला पदाधिकारी दिव्या मराठे नाराज झाल्या.
दरम्यान, शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर गोळा झाले. आक्रमक कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. साहेब मी नोकरी सोडली, हे गद्दारांना तिकीट देतात, अशी खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात बोलताना भाजपाचे कार्यकर्ते म्हणाले की, “ भाजपासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, पक्षासाठी मी नोकरी सोडली. त्यानंतरही आम्हाला डावललं. अमचा परिवार तीन पिढ्यापासून भाजपासाठी काम करतो. आमच्यात काय कमी आहे, आम्ही निष्ठावंत असतानाही नवीन माणसाला यांनी उमेदवारी दिली. 20- 25 वर्षापासून आम्ही भाजपाचं काम करतो आहे. मग आमच्याबरोबर असा अन्याय का केला? माझं नेमकं काय चुकलं यांनी सांगावं?” असा प्रश्न उपस्थित करत अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
दिव्या मराठे म्हणाल्या की, “ जेव्हा पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असताना मी घरादाराचा विचार नकरता पक्षाचे काम केले. ऑपरेशन मागे टाकून लोकसभा, विधानसभेत पक्षाचा प्रचार केला. आज पक्ष एक मोठा झाल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे असल्याची खंत व्यक्त करत मागील निवडणुकीत माझा एबीफॉर्म पळवला होता, आता मला डावलण्यात आलं. मी कुठे चुकली ते तरी सांगा म्हणत मराठे यांनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारला.



Comments