top of page

जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बचा राजकारणाला हादरा; थेट मोदी-शाहांकडे मागणी

16 hours ago
3 min read

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित देवाण- घेवाणीचा गंभीर आरेाप केला आहे. त्यांनी मेळाव्यातील आपल्या भाषणामध्ये शिंदेंना “ माझं नांव सांगून तुम्ही दिल्लीतून भाजपच्या लोकांकडून 500 कोटी रुपये आणले आहेत का? आणि हे पैसे मला दिलेत असं तुम्ही त्यांना सांगितलंय का?” अशी थेट विचारणा केली होती. यावर शिंदेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले तसेच चॅलेंजही दिले होते. यानंतर जरांगेंनी पत्रकारपरिषद घेत एक खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. यसा क्लिपनंतर आता रामदास कदम यासंनी मोठं पाऊल उचललं आहे.


मनोज जरांगे पाटलांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते मनेाज जरांगेंना पाठवल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समोर येत आहे. या ऑडिओ क्लिपबाबत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये तूतू-मैमै सुरू आहे.

दरम्यान माजी मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी तातडीनं प्रसिद्धीपत्र काढत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यांनी या ऑडिओ क्लिपमधील सर्व भाजपचे नेते आहेत, एकही आमचा नेता नाही. संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच पत्र लिहिल्याची माहितीही समोर आली आहे.


रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच या चर्चेत कोण कोण बोलत आहेत? त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे? संभाषण करणारी माहिला कोण? याची तात्काळ चौेकशी करण्यात यावी. तसेच सदर ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या 500 कोटींच्या आरोपाबाबतची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तसेच मोहन भागवत यांना पत्र लिहून केली आहे.


या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी म्हणजे ‘ दूध का दूध पाणी का पणी’ होऊन जाईल असंही कदम म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना हेतुपुरस्कर बदनाम करण्याचा हा षडयंत्र असल्याचा आरोपही माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.


मराठा समाजाने नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉन्फरन्स कॉलद्वारे झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप पत्रकारांना दिली. “ या ऑडिओ क्लिपनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पण अचानक हा विषय 2 वर्षानंतर जरांगे पाटलांच्या मार्फत समोर आला. या ऑडिओ क्लिपची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे. या चर्चेमध्ये भाजप पक्ष कसा वाढवला पाहिजे याची देखील चर्चा 30 मिनिटेद आहे. सदर बाब ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत यांच्या निर्दशनास आणून देणे आवश्यक आहे, असंही कदम यांनी म्हटलं आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट राजधानी दिल्लीतून जरांगे पाटलांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते, नेते बोलताहेत. कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि घेतलेली नाही. ते देण्याचा प्रश्नही नाही, असं स्पष्ट केलं होतं. तसंच ज्याकाही आधारावर जरांगे पाटील हे बोलताहेत त्याची अगोदर शहानिशा त्यांनी करायला पाहिजे होती. शहानिशा करूनच त्यांनी बोलायला पाहिजे होतं, असंही त्यांनी म्हटलं होतं.


तसेच मनोज जरांगे यांच्याकडे 500 कोटींच्यवा जे काही पुरावे असतील, तेही त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. दुध का दुध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. एकनाथ शिंदेला महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देश ओळखतो, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.


माझ्या कामाची पद्धत सगळ्यांनी माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं की, हेडलाईन होते. म्हणूनच बरेच लोक नावं घेतात. मनोज जरांगे हे मराठा समाजाचं काम करताहेत. मराठा समाजाचं काम त्यांनी केलं पाहिजे. ते समाजाचं काम करत होते, म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना मराइा समाजाला न्याय देण्याचं काम केल्याचंही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना सांगितलं होतं.


Comments


bottom of page