जरांगे पाटलांना भुरळ, बेडरेस्टचा डॉक्टरांचा सल्ला; नियोजीत हिंगोली दौर्यासाठी रवाना
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा शड्डु ठोकला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. असा इशाराच जरांग यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान , एकीकडे ते या मोर्चाची तयारी करत असताना आज नांदेडमध्ये त्यांची प्रकृती अचनाकपणे खालावली.
डॉक्टरच्या टिमने त्यांच्यावर तात्काळ उपचार केले. आशक्तपणामुळे भुरळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे पाटील यांना बेडरेस्टची अवश्यकता असल्याचेही उपचार करणार्या डॉक्टरच्या टिमने म्हटले. पण समाजकार्याच्या कर्तव्यामध्ये तसूभरही मागे हटणार नाही, भले यात माझा जिव गेला तरी चालेल असे म्हणत जरांगे पाटील यांनी सायंकाळी नियोजीत हिंगोलीकडे रवाना झाले.
मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे रात्री उशीरा नांदेडमध्ये आगमन झाले. लातूर दौरा आटोपून (14 ऑगस्ट) जरांगे पाटील अहमदपुर, माळेगाव (यात्रा), माळाकोळी, लोहा, पार्डी, वडेपुुरी, विष्णपूरी मार्गे मारताळा येथून नांदेडमध्ये आगमन झाले. दरम्यान,मारताळा येथील बैठकीनंतर जरांगे पाटील नांदेड येथील विश्रामगृह येथे आगमन झाले. आज 15 (ऑगस्ट) रोजी नांदेड येथे बैठकीस मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांना अचनाक भुरळ आली.
वेळीच डॉक्टरच्या टिमकडून उपचार करण्यात आले, आशक्तपणामुळे भुरळ आल्याने डॉक्टरांनी जरांगे पाटील यांना बेडरेस्टचा सल्ला दिला. मात्र, जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर नियोजीत दौर्यानुसार सायंकाळी हिंगोलीकडे रवाना झाले.
बैठकीत पाकिट चोर पकडला : जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव उपस्थित झाले होते. मात्र यावेळी बैठकीत चोरटे शिरल्याचे समोर आले. चोरट्यांनी अनेकांची पाकिटे पळवली. यापैकी एक चोर चोरी करताना मराठा बांधवांच्या हाती लागला. मराठा बांधवांनी त्यास चांगला चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले.
Comments