top of page

जरांगे पाटील हत्या कटातील दादा गरूडचा नवा व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुख हत्येशी ‘ कनेक्शन’?


जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दादा गरुडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडिओमध्ये बीडेच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नावा दावा करण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


यापूर्वी आरोपी दादा गरुड याचे दोन व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन व्हिडिओमध्ये गरुडने असा दावा केला आहे की, संताष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. हा दवा करताना त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचाही उल्लेख केला आहे. मात्र दादा गरुड हा नेमकं कोणाला सांगतोय, या व्हिडिओ मधून स्पष्ट होत नाही. शिवाय वीस कोटी रुपयांची ऑफर कोणी दिली या संदर्भातही संभाषणामध्ये उल्लेख आढळत नाही मात्र ही क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.


बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घुण हत्या झाली. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे पालिस तपासात स्पष्ट झाले. देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोषारोपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले. अखेर मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Comments


bottom of page