top of page

जरांगे पाटीलांचे निकटवर्तीय अतुल घरत यांचा अपघातात मृत्यू

बीडमधील दासखेड फाट्यावर स्विप्ट कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार अतुल घरत यांचा जागीच मृत्यू, घात की अपघात सोशल मिडियावर संशयाचे वादळ

ree

बीड: राज्याला हादरवून टाकरणारी मोठी घटना बीडमधे घडली आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात स्विप्ट कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय अतुल घरत (रा. महाजनवाडी, ता.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे ज्या कारने अतुल घरत यांच्या दुचाकीला धडक दिली, त्या कारवर ‘किंग आण्णा’असा मजकूर लिहिलेला असून अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांची वर्दी आढळल्याची माहिती आहे. यामुळे या अपघातामागे घातपात असल्याचा संशय सोशल मिडियातून व्यक्त केला जात आहे, त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.


बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी अतुल घरत हे पाटोदा येथून आपल्या गावी परत येत असताना दासखेड फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव स्विप्ट कारने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अतुल घरत यांच्यासह दुचाकीला जवळपास 250 फूट फरपटत नेलं. अपघात स्थळावर वाहनांचे अवशेष या अपघाताची भीषणता दर्शवतात. अपघातग्रस्त स्विप्ट कार चे पुढील एका बाजूचे चाक नादूरुस्त झाल्याने चालकाला कार घटनास्थळावर सोडून द्यावी लागली. या अपघातात अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघात घडवून चालक फरार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. यावेही तपासणी केली असता अपघाग्रस्त कारवर ‘किंग अण्णा’ असं लिहिलेलं आढळलं. अतुल घरत हे मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय मानले जायचे, हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला घातपात असावा, असा संशय आता व्यक्त होत आहे. या संशयाची सुई वाल्मीक ‘आण्णा’ कराड याच्या दिशेने जात आहे. कारण मागच्या काही काळात मनोज जरांगे यांनी संताष देशमुख खून प्रकरणावरून वाल्मिक कराडला चांगलंच घेरलं होतं. याच कारणातून हा घातपात घडवलेला असू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.


मात्र या अपघाताशी वाल्मिक कराड याचा थेट संबध असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही. पाटोदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रकरणातील सत्य काय आहे? हा अपघात होता की घातपात, हे फरार चालकाला अटक केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments


bottom of page