जालन्यात पोलिस अधिकार्याची आंदोलनकर्त्याच्या कमरेत फिल्मीस्टाईल लाथ
- Navnath Yewale
- Aug 15
- 1 min read

जालना: पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवल्याच्या रागातून पोलिस अधिकार्याने आंदोलकाच्या करेत फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याचे समोर आले आहे. जालन्यातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असे या अधिकार्याचे नाव आहे. या अधिकार्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून अमित चौधरी आणि गोपाल चौधरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पत्नीचे कुटुंबीयांनी तिचे परस्पर लग्न लावून दिले असल्याचा आरोप असून कुटुंबांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे.
या बाबत दाद मागण्याासठी चौधरी यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हा दौर्यावर असलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने पोलिस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौधरी यांना बाजूला करताना अगदी फिल्मी स्टाईलने उडी मारून कमरेत लाथ घातली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणावर आता अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी गेली होती आणि त्याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले. पोलिस कर्मचार्यांच्या अंगावरही त्याने डिझेल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बळाचा वापर केला. असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.



Comments