ज्ञाणेश कुमारांच्या कार्यकाळात ‘इलेक्शन कमिशन’मध्ये मोठी उलथापालथ; 20 महिन्यात मुख्य निवडणुक अधिाकर्यांसह 18 ते 20 बदल्या

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांची इंडिया आघाडी आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून एकापाठोपाठ गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून तीव्र आंदेालनं, निषेध मोर्चे सुरू आहेत. या पार्श्वभूमिवर आणखी एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या 20 महिन्यांच्या कार्यकाळात देशभरातील सुमारे 18 ते 20 मुख्य निवडणूक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तुलनेत ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या आयोगाशी निगडीत मुख्य तसेच वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्याचीं सरासरी अधिक आहे. या नव्या माहितीमुळे देशाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे देशभरात, व्होट चोरी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून (एसआयआर) मोठा वादंग निर्माण झाला आहे. याचदरम्यान, द इकॉनॉमिक टाइम्सनं वृत्त ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळातील बदल्यांचा मुद्दा पुढे आणल्यामुळे चर्चांना उधान आलं आहे.
ज्ञाणेशकुमार यांनी मुख्य निवडणुक आयुक्त फेब्रूवारी 2025 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून सुमारे 20 महिन्यांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 18 ते 20 मुख्य निवडणुक अधिकारी तसेच आयोगाचे वरिष्ठ अधिकारी महत्वाची बाब म्हणजे त्यात उप निवडणूक आयुक्त (डीईसी) यांच्या स्तरावरीलही अनेक महत्वाच्या बदल्यांचा समावेश आहे.
यापूर्वी माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे 33 महिन्यांच्या कार्यकाळात सुमारे 23 मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. या काळात 2024 ची लोकसभा निवडणूकही पार पडली होती. त्याआधी मुख्य निवडणुक आयुक्त पदाचा पदीार सांभाळलेल्या सुनील अरोरा आणि सुशील चंद्र यांच्या कार्यकाळतही 29 मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. लोकसभा निवडणुका देखील झाल्या होत्या.
साधारण: लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत मुख्य निवडणुक अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येत असतात. मात्र देशात 2024 मध्येच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर 2025 आणि 2026 या 20 महिन्यांच्या कालावधीत 18-20 मुख्य निचडणूक आयुक्तांसह विविध अधिकार्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. त्यात ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त बदल्या झाल्या आहेत.



Comments