ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उत्सवदिनी अलंकारीत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते संपन्न
- Navnath Yewale
- Nov 18
- 1 min read

पुणे /आळंदी: ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव निमित्त्याने न्यू एज मीडिया पार्टनर ह्या जाहिरात संस्थेतर्फे अलंकारीत ज्ञानेश्वरीचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वांद्रे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित प्रकाशन सोहळ्यात देखण्या अश्या अलंकारिक ज्ञानेश्वरीचे प्रकाशन झाले. अलंकारीत ज्ञानेश्वरी हि अत्यंत देखणी, नव्या पिढीला आकर्षित करणारी, भेट देण्यासाठी उपयोगी ठरेल असे आशिष शेलार ह्या प्रसंगी म्हणाले.
अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या अक्षरांचा आकार देखील मोठा असल्याने ज्येष्ठ नागरिकांना देखील वाचनास सुलभता येईल. न्यू एज मीडिया पार्टनर प्रा ली ह्या जाहिरात संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने हाती घेण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचेही ते ह्या वेळी म्हणाले. ज्ञानेश्वरी ही संपूर्ण मानवजातीला, संपूर्ण सृष्टीला कवेत घेणारी, परमार्थाचा आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत च्या जीवात्म्याच्या प्रवासाचे अत्यंत सूक्ष्म वर्णन करणारी दिव्य ग्रंथरूपी दिशा आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि भक्तीमार्गाची शिकवण देत प्रत्येकाला योग्य मार्गक्रमणाची प्रेरणा देणारे हे अमृतवचन आहे असे देखील श्री. आशिष शेलार म्हणाले.
प्रकाशन सोहळ्यास न्यू एज मीडिया पार्टनर चे संचालक प्रसाद कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, अमित कबरे, महेश चव्हाण, संतोष किल्लेकर, मुकेश मोरे, प्रशांत कांगणे, चंद्रकांत जाधव, जसपाल जाधव आदी मान्यवर उपस्थित



Comments