top of page

ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा कायद्याच्या कचाट्यात?

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचनामा प्रसिद्ध करण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यासंनी शिवसेना भवनात एकत्रित येत ‘ मुंबईसाठी शिवशक्तीचा वचननामा’ मांडला. ‘ ठाकरेंचा शब्द ’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यामध्ये अनेक अश्वासने देण्यात आली आहेत.


ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘ आरोपत्रा’ च्या माध्यमातून प्रहार केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक माजी खासदार राहुल शेवाळे आणि मंत्री आशिष शेलार यांनीही वचननाम्यावरून ठाकरे बंधूंना घेरले. आरोपांच्या फैरी झडत असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर मुद्दा पुढे करत थेट वचननाम्यावर आक्षेप घेतला.


वचननामा चुकीचा असल्याचे सांगत त्याविरोधात निवडणूक आयोाकउे तक्रार केल्याची माहिती सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, वचननामा चुकीचा आहे. मतदारांवर प्रभाव टाण्याच्या उद्देधाने कोणतेही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजूरी किंवा आर्थिक परिणामांचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत. खोटी अश्वासने खोटी अमिषे दाखवली जात आहेत.


सुप्रीम कोर्टाच्या एका निकलाचा हवाला देत सांगितले की, सुप्रीम कोर्टाने मोफत सवलतींबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कायदेशीर आधाराविना सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधान, शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे. राजकीय पक्षांनी निधी स्त्रोत, आर्थिक परिणामही जाहीर करणे बंधनकारक आहे.


वचननाम म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालासोबत केलेला द्रोह आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असा दावा गुणरत्न यांनी केला आहे. तसेच आपल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने ठाकरे बंधूंना जाहिरनामा सार्वजनिकपणे प्रसारित करण्यास मनाई करावी अशी विनंतीही आयोगाकडे केल्याची माहिती सदावर्ते यांनी दिली.

Comments


bottom of page