top of page

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला, उद्या जाहीर घोषणा ! खासदार संजय राऊत यांचा ट्विट संदेश


मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्राकर परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटवरून जाहीर केले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही पक्षप्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना- मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे.

हे ही पहा: लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा,https://youtu.be/CZT-d0k7nfU


शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देणत आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही.वरळीमधील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. त्यानुंसार आता ट्विट करून संजय राऊ त यांनी युतीच्या घोषणाचा मुहूर्त सांगितला आहे.


हे ही पहा: लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, https://youtube.com/shorts/anWnG5y-7x4?feature=share


एकनाथ शिंदेची बोचरी टीका :

लोकांनी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना वारंवार घरी बसवलं. देशामध्ये एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये एनडीएचं सरकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील एनडीएला भरघोस मतदान मिळालेलं आहे. महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीमध्ये बेरीज पकडली तर एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. असली आणि नकली कोण आहे हे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलं आहे. असली आणि नकलीवर कोण बोलतील हे मला वाटत नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले त्या ठिकाणी त्यांना विकास करणे मूलभूत सुविधा देणे भघोस निधी देणे हा शिवसेनेचा अजेंडा असणार आहे. ते देण्याचे काम आम्ही करणार आहोत. नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती येणार्‍या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच भगवा झेडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Comments


bottom of page