डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय; आता थेट युद्धात उडी, जगाची झोप उडाली.
- Navnath Yewale
- Oct 2
- 2 min read

सध्या अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू आहे, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. दोन बलाढ्य देश आमने-सामने आले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध विरामाची घोषणा व्हावी यासाठी अमेरिकेकडून रशियावर आणि काही प्रसंगी युक्रेनवर देखील दबाव टाकण्यात येत होता. मात्र आता अमेरिकेनं आपल्या या भुमिकेपासून युटर्न घेत धक्कादायक निर्णय घेतला आहे, ट्रम्प यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात जेवढी शक्य होईल तेवढी युक्रेनची मदत करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार आता अमेरिका युक्रेनला रशियावर हल्ला करण्यासाठी मदत करणार आहे.
अमेरिका रशियाची गुप्त युक्रेनला पुरवणार आहे, रशियाचे ज्या-ज्या ठिकाणी कच्च्या तेलाचे साठे आहेत, अशा सर्व ठिकाणी युक्रेनला हल्ल्यासाठी अमेरिका मतद करणार आहे. या वृत्तपत्रात असा दावा देखील करण्यात आला आहे की, रशियाची गुप्त माहिती असलेला डेटा युक्रेनला देण्यासंदर्भातील एक प्रस्ताव देखील अमेरिकेनं मंजूर केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आता युक्रेनला पेंटागॉनकडून रशियाची सर्व प्रकारची गुप्त माहिती मिळणार आहे, ज्याच्या आधारे युक्रेनला सहजपणे रशियाच्या कच्च्या तेलाचे साठे असलेल्या ठिकाणांवर मिसाईल हल्ला करण्यास मदत होणार आहे. हा रशियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एवढंच नाही तर अमेरिकेनं नाटो देशांना देखील युक्रेनला मदत करण्याचं आवाहन केलं आहे, तसेच युक्रेनला युद्धासाठी अत्याधुनिक शस्त्र पुरवण्याच्या प्रस्तावावर देखील अमेरिकेत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेनं युक्रेनला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे आता युक्रेनची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे आता जगाचं टेन्शन वाढलं आहे, यातून एका मोठ्या युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा रशिया आणि अमेरिका आमने- सामने आले आहेत. अमेरिकेकडून सुरुवातीला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत होते, पुतिन आणि ट्रम्प यांची एक बैठक देखील पार पडली होती, मात्र ट्रम्प यांना युद्ध विराम करण्यात यश आलं नाही, त्यानंतर आता अमेरिकेनं धक्कादायक निर्णय घेतला आहे.



Comments