top of page

..तर अशी आमदारकी मला नकोच, मी तिचा त्याग करेन सोलापूरात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यासमोरच प्रतिज्ञा

सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी अनेकदा बोललो आहे. मी जबाबदारीने सांगतो की, सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी आमदारकीच्या निवडणुकीत मतं मागायला तुमच्या दारात येणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतो. मी माझ्या लोकांना दररोज पाणी देऊ शकत नसेल, तर मला अशी आमदारमी नको. मी माझ्या आमदारकीचा त्याग करेन, अशी प्रतिज्ञा भाजपचे आमदार दवेंद्र कोठे यांनी आज सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.


सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (दि.10 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूवीृ आमदार देवेंद्र कोठे यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याच्या मुद्यावर भाष्य केले. आमदार कोठे म्हणाले की, मी पालकमंत्री गोरे आम्ही प्रमाणिकपणे काम करतोय. मुख्यमंत्री फडणवीस हे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला न्याय देण्याचे काम करतील, असा मला विश्वास आहे. सुमारे 892 कोटी रुपयांची योजना मंजूर करून सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.


अनेकांनी माझ्या बोलण्यावर टीका केली, हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलतो. निवडणुक स्टंट आहे. निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठ बोलतोय. पण, गेली वर्षभर मी जे बोललो आहे, ते मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करून घेण्याचाा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. पण ही माझी व्यथा नाही, तर ही माझी भूमिका आहे असंही देवेंद्र कोठे म्हणाले.


कोठे ुपुढे बोलताना म्हणाले की, मी आतापर्यंत बोललो नाही किंवा कोणाला माहित नाही. पण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतलं हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून बोलावसं वाटतं. मागील तीन महिन्यांपासून मी सत्काराचा फेटा बांधून घेतला नाही. मी संकल्प केला आहे की, जोपर्यंत मी शहरातील महिलांना दररोज पाणी देणार नाही, तोपर्यंत फेटा बांधून सत्कार स्वीकारणार नाही, हे मी तुमचा भाऊ तुमच्या पाणीप्रश्नासाठी काम करेन, हा विश्वास मी तुम्हाला देतो.


मी मोठं बोलत नाही. माझ्या प्रभाग सातच्या जनतेला विचारा, मी 2012 मध्ये ज्या प्रभागातून नगरसेवक झालो, त्या प्रभागात पाण्याची खूप टंचाई होती. त्या प्रभागातील पाण्याचे 70 टक्के काम केले, त्यामुळे लोक मला पाणीदार नगरसेवक म्हाणायचे. तो अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे, असेही कोठेंनी यावेळी नमूद केले.


एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची ग्यारंटी देतोय, तर दुसरीकउे काँग्रेस खासदार विकास होणार नाही; म्हणून गॅरंटी देतात. त्यामुळे मतदारांनी काम करणार्‍यांच्या पाठीशी उभं रहायचं की काम न करता तीन महिने, सहा महिन्यांत एखाद्या दिवशी सोलापूरात यायचं किंवा एखाद्या तालुक्यात जायचं आणि दहा लाखांच्या सभागृहाचं उद्घाटन करायचं आणि बोलायचं नरेंद्र मोदींवर. अशा गप्पा मारणार्‍यांच्या पाठीशी राहायचं, अशा शब्दांत देवेंद्र कोठे यांनी नाव न घेता खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली.

Comments


bottom of page