top of page

..तर बीएमसीच्या सर्व जागा लढू, एकनाथ शिंदेच्या शिवसेना पदाधिकार्‍यांचा सुर!

ree

मुंबई: मुंबई महानगर (बीएमसी) पालिकेसाठी जागावाटपादरम्यान भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या ठाकम भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधील अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. 2017 च्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या 84 जागांवर दावा केला असला तरी हाच फॉर्म्यूला शिंदेच्या शिवसेनेसाठी लावण्यास भाजपचा विरोध आहे. म्हणजेच 2017 मध्ये संयुक्त शिवसेनेनं जिंकलेल्या 82 जागा यंदा जागावाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेला सरसकट देण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. मागील काही दिवसांपासून या वाटाघाटी सुरू असून काहीच तोडगा अद्याप न निघाल्याने शिंदेच्या पदाधिकार्‍यांनी आता थेट ‘ एकला चालो’ ची भूमिका घेण्यासाठी पक्षोच प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव टाकण्यास ुसुरूवात केल्याची माहिती आहे.


सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये सर्व म्हणजेच 227 जागा लढूया, असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पदाधिकार्‍यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी शिंदेवर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका, अशी शिवसेनेच्या नेत्यांची ठाम भूमिका असून त्यांनी ती एकनाथ शिंदे आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना कळवली आहे.


दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठ्या प्रमात तडजोड केली मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजिबात तडजोड करू नका अशी शिवसेना नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे. कालच शिंदेंच्या शिवसेनेनं 227 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षातील नेत्यांना पदाधिकार्‍यांना श्रद्धा आणि सबुुरीचा सल्ला दिल्याची सुत्रांची माहिती आहे.


दरम्यान, केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेमध्येसुद्धा मी आणि देवेंद्रजी यामधून तोडगा काढू, असं अश्वासन एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना दिलं आहे. चर्चेतून एक सकारात्मक तोडगा नक्की निघेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त केला आहे.


मात्र, या विषयावर तोडगा निघाला नाहीत तर, खरोखर शिंदेंना पदाधिकार्‍यांचं एकावं लागलं तर मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटू शकते आणि मुंबईत महायुतीमधील तिन्ही घटकपक्ष एकएकटे लढतानाही दिसू शकतील. अधीच अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये संयुक्त लढ आहे.

Comments


bottom of page