top of page

... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर

ree

भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आहे”


त्यांनी एसआयआरवही प्रश्न उपस्थित केले, “ जर एसआयआरचा उद्देश बेकायदेशीर बांगलादेशींना काढून टाकणे असेल, तर ते भाजपशासित राज्यांमध्ये का केले जात आहे? भाजप त्यांच्या ‘ डबल-इंजिन ’ राज्यांमध्येही घुसखोर अस्तित्वात आहेत, हे मान्य करत आहे का? जर बांगलादेशी समस्या असतील तर ते मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये एसआयआर का करत आहेत?


एसआयआर नंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक आयोग आणि भाजपने किती विनाश केला आहे, हे लोकांना समजेल, त्या म्हणाल्या की, “मला बंगलादेश एक देश म्हणून आवडतो कारण आमची भाषा एकच आहे मी बीरभूमची आहे, पण एके दिवशी ते मला बांगलादेशी म्हणतील.” ‘2024 मध्ये पंतप्रधान मोदींना या मतदार यादीच्या आधारे मते मिळाली. जर तुमचे नाव वगळले तर केंद्र सरकार देखील काढून टाकले पाहिजे’ असा घणाघात करत ममता बॅनर्जी यांनी एसआयआर वरुन भाजपवर निशाना साधला.

Comments


bottom of page