तार चोरायल भिडले, अन् टॉवर कोसळून जीवानिशी गेले टॉवर कोसळून दोघांचा मृत्यू; केज येथील घटना
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read

बीड: जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या पवन उर्जा प्रकल्पांतील स्टोअर रुम, शेतशिवारात ठेवलेले केबल एवढच नाही तर चक्क रेल्वेच्या कामासाठी आणलेले केबल चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र, मेन लाईनचे लोखंडी टॉवरच्या तार चोरीचा प्रकारही आता समोर आला आहे. केज तालुक्यातून मार्गस्थ होणार्या मेन लाईनच्या लोखंडी टॉवरची तार चोरण्यासाठी टॉवर चढलेल्या दोघांना चारीच्या नादात आपला जीव गमवावा लगला.
केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात मेन लाईनच्या तारेची चोरी करताना पुण्यातील दोन युवक रविवारी (दि.29) लोखंडी टॉवरवर चढले. तार चोरी करत असताना संतुलन बिगाडल्याने टॉवर जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत अविनाश पाटोळे , आकाश आडे यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर घाबरलेल्या त्यांच्या साथीदारांनी हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मयतांच्य साथिदारांनी दोघांचे मृतदेह तात्काळ सोबत आणलेल्या इर्टिगा कारमधून परभणी येथे नेले. परभणीत पोहोचताच साथीदारांनी पसार झाले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृतांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कार चालक सूरज गिराम याला ताब्यात घेतले असून बीडच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळारवरून पुरावे गोळा केले असून केज पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.



Comments