top of page

तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू.. धुळ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

धुळे: राज्यात होत असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास 68 उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्दयावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक अयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्दयावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.


“या वेळेला आपण सर्वांनी कमला केलीत. सर्वच निवडणुकांचा माहोल आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण धुळ्यात सुरुवातीलच चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तुम्ही बिनविरोधचा चौकार लगावला आहे. धुळ्यामध्ये भाजपने चार नगसेवक निवडून आणले आहेत. पण आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काही लोकांना मात्र मिर्ची झोंबली आहे. अब तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू..”अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.


“ देशाच्या लोकसभेमध्ये तब्बल 35 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात निवडून आले आहेत. खासदार जेव्हा बिनविरोध निवडून येतात तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला. असे म्हणणार्‍यांचे डोकं नेमकं कुठे आहे हे सांगण्याची अवश्यकता नाही. आमची जनता आमच्यावर प्रेम करते. आम्ही जनतेचे स्वीकारतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. प्रत्येक शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे अश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठकारे म्हणाले होते की, सध्याची सत्ता लोकशाही नसून झुंडशाही आहे. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लादल्या जात असून, निकाल राखून ठेवले जात आहेत. मतदारांना मतदनापासून वंचित ठेवले गेले. विशेष: जेन-झी मतदारांचा हक्क हिरावला गेला आहे. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तेथे प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Comments


bottom of page