top of page

दादारमध्ये चेतन कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला !

ree

मुंबई: मुंबईतील दादरमध्ये चेतन कांबळे या समाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रविवारी रात्री चेतनच्या राहत्या इमारतीत घुसून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. अमली पदार्थाची विक्री आणि जुगाराविरोधात आवाज उठवल्याने त्याच्यांवर हल्ल्याचा संशय आहे.


सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांना दिपक चौगुले आणि त्याच्या मित्राकडून मारहाण झाल्याचे सांगितले जाते. हल्ल्याच्या घटनेला 12 तास उलटून देखील प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


चेतन कांबळे हा दादर परिसरात‘ चकाचक दादर’ नावाने एनजीओ. अंमली पदार्थांची विक्री आणि जुगाराविरेाधात त्याने अनेकदा आवाज उठवला आहे. याचाच राग मनात ठेवून चेतनवर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्याला 12 तास उलटूनही अद्याप आरोपी फरार आहेत. चेतनला याआधी हल्लेखोरांनी धमकी दिल्याची माहिती आहे.

Comments


bottom of page