दिल्ली दौर्यात सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांबाबतच्या प्रश्नावर संतापल्या!
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण सुत्रे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. मात्र, सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यातच, आज सुनेत्रा पवार दिल्ली दौर्यावर असताना राष्ट्रवादीचे दोन्ही वरिष्ठ नेते दिल्लीत त्यांच्यासमवेत नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुनेता पवार यांनी कडक शब्दात उत्तर दिलं.
अजित पवारांच्या निधनानंतर एक महिन्याने म्हणजेच 20 फेब्रूवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना निवडी दरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आले त्यात संविधानात बदल करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलं आहे. सुनेत्रा पवार यांच नुकतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं, त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा असे नमूद करण्यात आले होत. त्यामुळे,राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्या काहीतरी आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौर्यात कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे दोघेही त्यांच्यासमवेत नसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होत आहे.
सुनेत्रा पवार दिल्लीतील असताना पत्रकारांनी, प्रफुल्ल पटेल आपल्या सोबत का नाही? असा प्रश्न सुनेत्रा पवार यांना विचारला असता त्यावर, ‘ तुम्हालाच माहित असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात ’ असं उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या पूर्ण दिल्ली दौर्यात प्रफुल्ल पटेल कुठेही दिसले नाहीत. त्यातच, त्यांच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या रायगड जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल दिल्लीत असूनही सुनेता पवार यांच्यासमवेत नसल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आहे. अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेलांवर रोहित पवारांनी आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संविधानात राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना मिळण्याबाबात प्रफुल्ल पटेलांनी सुनिल तटकरेंना पत्रव्यवहार केल्याचा आरोप रोहित पवार यासंनी केला होता. त्यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानाची प्रत समोर आली आहे, पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्यांक सेल सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून काढून टाकण्यात आले. एकत्रित राष्ट्रवादीच्या जुन्या संविधानात एकूण 7 फ्रंटल सेल होते. मात्र, नव्या संविधानात केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या सेलचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.



Comments