top of page

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक संशयित ताब्यात जम्मू-काश्मीमधील श्रीनगरच्या बटमालूमध्ये एसआयएचा छापा

ree

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्था (एसआयए) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदच्या (जेइएम) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तुफैल अहमद असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. तो पुलवामा येथील इलिक्ट्रिशन आहे.


त्याला एका औद्योगिक क्षेत्रातून चौकशीसाठी नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे तुफृैलचा कटात सहभाग असल्याचे दर्शवतात. याच प्रकरणी आता अधिक तपास केला जात आहे.

मुझफ्फर अहमद राथेर याच्या अटकेनंतर तुफैल अहमद याची अटक करण्यात आली आहे.


मुसफ्फर हा काश्मीरमधील काझीगुंड येथील रहिवासी आहेत. ऑगस्टमध्ये हिंदुस्थानातून पळून गेल्यानंतर तो आफगाणिस्तानात असल्याचे बोलले जात आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फर याने जैश-ए-मोहम्मदच्या हँडलर्स आणि व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्कमधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची शिफारस देखील केली आहे. जेणेकरून त्याचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करता येईल आणि तपास पुढे चालू राहील.

Comments


bottom of page