दिल्ली स्फोट: हा तर फक्त ट्रेलर, केवळ एक आय 20 नव्हे 32 कार तयार; बाबरी वर्धापनदिनी देशात सीरियल अटॅकचा होता प्लॅन
- Navnath Yewale
- Nov 13
- 2 min read

नवी दिल्ली : लाला किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांच्या मते, दहशतवादी 6 डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या तयारी होते.
या हल्ल्यांसाठी त्यांनी 32 कारांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या योजना होत्या. या गाड्यांमध्ये ब्रेजा. स्विप्ट डिजायर, इकोस्पोर्ट अणि आय 20 अशा अनेक मॉडेल्सचा समावेश होता. आतापर्यंत तपास संस्थांना चार गाड्या सापडल्या आहेत.
दरम्यान, 10 नोव्हेंबरला ज्यात स्फोट झाला ती आय 20 कारही या ‘सीयिल रिवेंज अटॅक’ चा भाग होती. या ब्लास्टमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्र सरकारने या कार ब्लास्टला दहशतवादी हल्ला मानले असून बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात प्रस्तावही पारित करण्यात आला आहे.
पोलिसांनी आधीच शंका व्यक्त केली होती की या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांकडे एक नव्हे तर दोन गाड्या होत्या. त्यामुळे बुधवारी दिल्ली, यूपी आणि हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर हरियाणातील खंदावली गावात एक संशयास्पद बेवारस कार आढळली. या गाडीची तपासणी करण्यासाठी एनएसजी बॉम्ब स्काड पोहोचले आहे. गाडी अद्याप पूर्णत: उघडण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, ही कार ज्याठिकाणी सापडली ते ठिकाण उमरचा ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीच्या बहिणीच्या घराजवळ आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये तीन मोठे खुलासे
जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केली होती.
दिल्लीला हादरवण्याचा कट जानेवारीपासूनच सुरू केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईल डंप डेटा मध्ये दिसले की, फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीमधून अटक केलेले असिस्टंट प्रोफेसर डॉ. मुजम्मिल गनी आणि स्फोटात मृत मानले जाणारे डॉ. उमर नबी याने जानेवारीत अनेक वेळा लाल किल्ल्याची रेकी केली होती. दोघांनीही तिथली सुरक्षा, गर्दी , पॅटर्न यांच अभ्यास केला होता. पोलिसांच्या मते या दोघांची योजना 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची होती, पण ती योजना तेव्हा फसली.
6 डिसेंबरला दिल्लीमध्ये हल्ल्याची योजना : नबीची इच्छा होती की, 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्याच्या दिवसाच्या वर्धापनदिनी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याची होती. परंतु मुजम्मिल गनीच्या अटकेनंतर ही योजना बिघडली. ही माहिती 8 आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. या इंटर- स्टेट मॉड्यूलचे केंद्र फरीदाबादमध्ये होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये 6 डॉक्टर असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रीनगरचा आणखी एक संशयित डॉ. निसार फरार असून तो डॉक्टर्स आसोसिएशन ऑफ कश्मीरचा अध्यक्ष होता. अल फलाहमध्ये तो अध्यापन करत होता. जम्मू- काश्मीर सरकारने त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.
खताची पोती सांगून विस्फोटक जमा करत होता: फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटील काम करणारा कश्मीरी डॉक्टर मुजम्मिल गनी किरायाच्या खोलीत खातची पोती असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जमा करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी तो काही पोती खोलीत ठेवण्यासाठी आला तेव्हा शेजार्यांनी विचारले हे काय आहे? त्यावर गनीने उत्तर दिले -हे खताचे कट्टे आहेत, काश्मीरला न्यायचं आहे. ज्या खोलीत हे साहित्य ठेवले होते त्यापासून 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे होते. पोलिसांनी त्या फुटेजचा ताबा घेतला आहे.



Comments