निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठवणार्या राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; न्यायमूर्तींसह सनदी अधिकारी, राजदूत मैदानात!
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read
272 जणांचे खुले पत्र ,निवडणूक अयोगाला ‘ राहूल गांधी बदनाम करतायत’

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 लोक मैदानात उतरले आहेत. यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी, (यामध्ये 14 राजदुत), 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे.
काँग्रेस अणि राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल थांबलेला नाही. त्यांनी या वर्षात तीनही अधिक पत्रकार परिषद घेऊन देशात मतचोरी होत असल्याचा आरोप केला.
त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघातील उदाहरणं समोर आणली. काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर हल्लाबोल होत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 दिग्गज मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी ( यामध्ये 14 राजदूतांचा समावेश आहे) आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ हे पत्र लिहिण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक अयोगाला बदनाम करत असल्याचा आरोप या 272 दिग्गजांनी लावला आहे. त्यांनी या पत्रात काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवला आहे.
या खुल्या पत्रात निवडणूक आयोगाविरोधातील कथित आरोपांच निंदा करण्यात आली आहे. आम्ही समाजातील ज्येष्ठ नागरिक या बाबतीत चिंता व्यक्त करतो की, भारतीय लोकशाहीवर बळाचा उपायोग नाही तर, तिच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात घातक वक्तव्य करून हल्ला करण्यात येत आहे. काही नेते हे नाटक वठवत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असे या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, या पत्रानुसार कधी भारतीय लष्कराच्या शौर्यावर तर त्यांच्या साहसावर प्रश्न उठवण्यात आले. कधी न्यायपालिकांवर, संसदेवर आणि तिथे काम करणार्यांवर सवाल करण्यात आले. आता त्यांच्या टार्गेटवर निवडणूक आयोग आहे. आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्यात येत आहे. या पत्रात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते वारंवार निवडणूक आयोगावर हल्ला चढवत आहेत. निवडणूक आयेाग मत चोरी करणार्यांसोबत असल्या विषयीचे ठोस पुरावे असल्याचा पण त्यांचा दावा आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. गांधी यांनी देशातील निवडणुक मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्या हायड्रोजन बॉम्बची अजूनही देशवासियांना प्रतिक्षा आहे.



Comments