top of page

दिल्लीनंतर आता पुण्यातही धडकणार ‘कॉक्रोच’; पुणे विद्यापीठासमोर गुरुवारी आंदोलन

Jun 9
1 min read

पुणे: नीट- यूजी पेपरफुटीच्या मुद्यावरून देशातील तरुणांमध्ये संताप वाढत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन महाराष्ट्रात विस्तारण्याची योजना जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने महाराष्ट्राची शैक्षणिक राजधाणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात 11 जून रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.


सीजेपीने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदेालन 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्याठाच्या परिसरात होणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीने साोशल मीडियावर समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, पुण्यातील किती कॉक्रोच या आंदोलनात सामील होतील,असा प्रश्नही उपस्थित केला आहे.


कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार हे आंदेालन पूर्णपणे शांततापूर्ण आणि विद्यार्थी - केंद्रीत असेल. आंदोलनाची रुपरेषेनुसार पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवरील तरुणांच्या प्रतिसादावरून असा अंदाज आहे की, पुणे आणि आसपासच्या शैक्षणिक संस्थांमधील हजारो विद्यार्थी आणि तरुण या आंदोलनात सहभागी होतील. डिजिटल विश्वात 20 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडलेल्या सीजेपी च्या या ऑफलाइन आंदोलनात विद्यार्थी झुरळांचे मुखवटे घालून आणि फलक घेऊन प्रतिकात्मकरित्या सहभागी होत आहेत.


खरं तर मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात बनावट पदवी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, डिजिटल कम्यूनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट अभिजीत दीपके यांनी या शब्दाला एक व्यंगात्मक शस्त्र बनवले. ते म्हणतात की, हा त्या तरुणांचा आवाज आहे ज्यांना ‘ निष्काळजी’ किंवा ‘ किटक’ समजून व्यवस्थेकडून अनेकदा दुर्लक्षित केले जाते.

Comments


bottom of page