दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - आय ए एस तुकाराम मुंढे, ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ मुळे दिव्यांग सक्षमीकरणाला डिजिटल गती ; दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

मुंबई: दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे.दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ (https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/) आणि मोबाईल ॲप चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, मंत्रिमंडळातील इतर मंत्री गण, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणे आणि स्वावलंबी बनविणे हा शासनाचा उद्देश आहे.
दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार योजना शोधणे, अर्ज करणे आणि लाभ मिळविणे अधिक सोपे व्हावे, या उद्देशाने हे ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या पात्रतेनुसार योजना शोधणे व त्याचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे निर्णयप्रक्रिया गतिमान होऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना वेळेत पोहोचतील.
दिव्यांगांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’मध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पोर्टलमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्जाची स्थिती रिअल-टाइममध्ये पाहता येईल. दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पोर्टल विषयी माहिती
सिंगल विंडो कार्यालयातील कामकाजाच्या सर्वसाधारण पद्धतीचे विभागाने 'बिझनेस प्रोसेस री-इंजिनिअरिंग' (BPR) द्वारे प्रक्रियेचे सुलभीकरण केले आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ (https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/) आणि मोबाईल ॲप चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.



Comments